*विरगुंळा केंद्राचा लोकार्पण सोहळा ,जेष्ठांना मिळाले हक्काचे सभागृह*
काटोल संवाददाता- दुर्गाप्रसाद पांडे
काटोल – जेष्ठांचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी जेष्ठ नागरीक मंडळ काटोल द्वारा नियमित कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. जेष्ठांच्या या कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 9 जुलै 2018 च्या शासन निर्णयानुसार त्यांना नगर परीषद काटोल द्वारा विरगुंळा केंद्र म्हणून शहराचे मध्यभागी भव्य सभागृह बाधुंन देण्यात आले. या सभागृहाचे लोकार्पण आज दिनांक 3 फरवरी 2022 ला कृषि मित्र प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा कृ.उ.बा.समितीचे संचालक श्री दिनेशजी ठाकरे यांचे शुभहस्ते करण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ वैशाली ताई ठाकुर होत्या. तर मुख्य अतिथी म्हणुन नगर परीषद काटोल चे सत्तापक्ष नेते तथा कृ.उ.बा. समिती काटोल चे सभापती श्री चरणसिंगजी ठाकुर त्या शिवाय नगर परीषद काटोल चे शिक्षण समिती सभापती प्राध्यापक श्री देवीदास कठाणे, बांधकाम समिती सभापती श्री किशोर गाढवे, आरोग्य समिती सभापती सौ.शालिनीताई बनसोड,महिला बाल कल्याण समिती सभापती सौ.शालिनीताई महाजन, नगरसेवक श्री तानाजी तोटे,मडंळाचे अध्यक्ष श्री रमेशरावतिजारे, उपाध्यक्ष श्री शामरावजी झामडे, जेष्ठ महिला आश्रयदात्या सदस्या श्रीमती निर्मलाताई कोंडे, नगर परीषद काटोल चे शाखा अभियंता श्री राजेंद्र काळे व श्री नितिन गौरखेडे मंचावर उपस्थित होते .
मा.श्री चरणसिंगजी ठाकुर यांनी मनोगत व्यक्त करताना, आता मी सुध्दा जेष्ठ नागरिक असुन मला त्याच्या समस्याची जाणीव असुन मंडळाचे कार्यात सहकार्य करीतच राहीन, असे आश्वासन दिले तसेच पुढील 100 वर्षाचा दुरदृष्टीकोण समोर काटोल नगरीतील विकास कार्य करण्यात येत असल्याचे सांगितले. यासाठी जेष्ठांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
सोहळ्याचे उद्घाटक श्री दिनेशजी ठाकरे व अध्यक्षा सौ.वैशाली ताई ठाकुर यांनी, मडंळाचे कार्याची स्तुती करून मंडळात विविध पदावर कार्य केलेले सुज्ञ वरिष्ठ नागरीक आहेत.त्यांनी नगरीच्या विकासासाठी सहकार्याची- अपेक्षा व्यक्त केली.
मडंळाची प्रस्तावना सादरीकरण व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मडंळाचे सचिव श्री गजाननराव भोयर यांनी केले.तर आभार प्रदर्शनाचे कार्य मडंळाचे उपाध्यक्ष श्री शामरावजी झामडे यांनी पार पाडले. कार्यक्रमाचे सुरवातीला खरा तो एकची धर्म हे समूह गीत व शेवटी ज्ञानेश्वरमाऊली चे पसायदान श्री रूपराव राऊत कोषाध्यक्ष व श्री संतोषराव धुर्वे यांनी सादर केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मंडळाचे सहसचिव श्री अरुण पुंड, श्री रूपराव राऊत कोषाध्यक्ष , श्री लीलाधर घारड व श्री सुरेख येवले यांचे विशेष सहकार्य लाभले.
Maharashtra News Media सच की आवाज