*गौवंशाचे अमानुषरित्या परिवहन करणाऱ्यांना अटक* *पोलिस स्टेशन सावनेर जि नागपुर ग्रामिण वाहतूक पोलिसांची कारवाई*

*गौवंशाचे अमानुषरित्या परिवहन करणाऱ्यांना अटक*

*पोलिस स्टेशन सावनेर जि नागपुर ग्रामिण वाहतूक पोलिसांची कारवाई*

सावनेरः दि ०३/०२/२०२२ रोजी पोलिसांना मुखबिर द्वारे गोपनिय खबर मिळाली की, कोदेगाव कडुन बोरूजवाडा कडे जाण- या आड रस्त्यावर जनावरांची अवैधरीत्या निर्दयतेने बांधुन त्यांना चारा पाणी न देता दाटी दाटीने अपु-या जागेत जनावरांना त्रास होइल अशा स्थितीत निर्दयतेने वेग वेगळया पिक अँपमध्ये कोंबुन भरून घेवुन जात आहे.*


*अशा खबरेवरून दि ०३/०२/२०२२ चे सायंकाळी 5-30 वाजता चे दरम्यान नाकाबंदी केली असता, 6-30 वाजताचे दरम्यान एकामेका मागे एक असे चार पिक अँप वाहने संशयित रित्या कोदेगाव कडुन बोरूजवाडा कडे येत असताना बोरूजवाडा फाटा येथे येतानी दिसले सदर चारही पिक अँप वाहनांना पाहणी करून विचारपुस केले असता १) एमएच ४० एके ४२३१ चालक नामे भुषण मोरेश्वर राऊत वय २२ वर्ष रा. मोहपा ता. कळमेशवर २) एमएच ४० बिजी ८२८४चालक नामे सुरज शिवलाल शनेश्वर, वय २२ वर्ष रा. मोहपा ता कळमेशवर ३) एमएच ४० बिजी ९६८१ चालक नामे योगेश साहेबराव उईके वय ३० वर्ष रा. मोहपा ता. कळमेश्वर ४) एमएच ४० सिडी ०६१५ चालक नामे अशोक श्रीराम इरपाते, वय ३० वर्ष, ता बुदला ता. कळमेश्वर यांचे चारही वाहनात ऐकुन १६बैल जनावरे अंदाजे किमत ८००००/ रु तसेच वाहनांची किंमत प्रत्येकी ५००००० /- रू ऐकुन वाहनांची किंमत २०,००,००० /- रू असा एकुण २०,८०,००० /- रूपयाचा माल मिळुन आल्याने सविस्तर घटनास्थळ पंचनामाकारवाई करून सदर बैल जनावरे हे जय श्रीकृष्ण भगवान गोरक्षण संस्था गोडेगाव बेलोना ता नरखेड जि नागपुर येथे दाखल करण्यात आले.*


*नमुद वाहन चालंकाविरूध्द कलम ११(१) (घ)(ड) (च) प्राण्यांना निर्दयतेने वागणुक प्रतिबंधक अधिनियम सन १९६० अन्वये पो स्टे सावनेर येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास परी पोउपनी दिनेश खोटेले करीत आहे.*

*सदर ची कार्यवाही मा श्री विजयकुमार मगर, पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामिण मा श्री राहुल माकणीकर, अप्पर पोलिस अधिक्षक नागपुर ग्रामिण, मुख्त्यार बागवान, उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मारूती मुळुक पो स्टे सावनेर, परी पोउपनी दिनेश खोटेले, पोहवा दिनेश काकडे, पोहवा रूडे पोहवा आशिष कारेमोरे ,पोशी नागरगोजे,पोशी शास्त्री यांनी केली आहे.*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …