Breaking News

*मंत्री सुनील केदारांच्या हस्ते विविध कामांचे भुमीपुजन* *शहराच्या सौदर्यीकरणात भर पडणार – ना.सुनील केदार*

*मंत्री सुनील केदारांच्या हस्ते विविध कामांचे भुमीपुजन*

*शहराच्या सौदर्यीकरणात भर पडणार – ना.सुनील केदार*

सावनेरः दि.4 : सावनेर शहरात 123 कोटी 26 लक्ष खर्चून बांधण्यात येणारे शासकीय विश्रामगृह व 1 कोटी 9 लाख ‍खर्चाचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयासोबत खर्चाचे महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान 10 खाटांचे अत्याधुनिक ट्रामा केअर सेंटर आणि नगर परिषद अंतर्गत वैशिष्टयपूर्ण योजनेंतर्गत बगीचा विकास कार्यक्रम व रस्ते विकास व सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत विविध विकास कामांचे भूमीपूजन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले.


या विकास कामांमुळे शहराच्या सौदर्यीकरणात निश्चितच भर पडेल,आकस्मिक अपघात घडल्यास तातडीने योग्य उपचार,त्यासोबतच नागरिकांना वाहतुकीसाठी स्वच्छ व सुंदर रस्ते मिळणार आहेत, असे श्री. केदार यांनी सांगितले.सोबतच महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवासाची समस्या अनेक दिवसापासून भेडसावत होती, या निवास स्थानामुळे त्यांच्याही समस्या दूर होईल व भविष्यात सदनिका मिळून त्याचा फायदा त्यांच्या कार्यक्षमतेवर होणार व शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचा लाभ येथे येणाऱ्या अधिकारी,पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना निश्चितच होण्याचा विश्वास व्यक्त केला.

*तर सावनेर नगर परिषदेच्या हद्दीतील प्रभाग क्र.7 मधील विविध सिमेंट रस्ते,नाल्या व ओपन स्पेसचे बगीचे विकसित करणे,प्रभाग क्र.9 व प्रभाग क्र.2 मधील नाली सिमेंट रस्ते आदी अनेक बांधकामाचे भुमीपुजन याप्रसंगी करण्यात आले*


*सदर आयोजनास नागपुर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मीताई बर्वे,उपाध्यक्षा सुमित्राताई मनोहर कुंभारे,डाँ.उदय नारलवार,डॉ.माधुरी धोरात,डॉ.दिपक सालोडकर,डॉ.मोहम्मद फैजल,उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, तहसिलदार प्रताप वाघमारे,प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण केन्द्र सावनेर च्या सहयोगी प्रपाठक डॉ.मंजुषा ढोबळे,वरिष्ठ अधिवक्ता श्रीकांत पांडे,सावनेर नगर पालीकेचे गटनेते नगरसेवक सुनील चाफेकर,काँग्रेस कमेटी अध्यक्ष पवन जैस्वाल,सचिव विजय बसवार,माजी नगरसेवक व उपाध्यक्ष गोपाल घटे,माजी नगरसेवक व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तेजसिंग सावजी,नगरसेवक निलेश पटे,माजी नगरसेवक लक्ष्मीकांत दिवटे,रामभाऊ उमाटे,शंकर आगलावे,प्रा.साहेबराव विरखरे,युवा नेते व व्यापारी संघाचे सचिव मनोज बसवार,सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश खंगारे,सचिन मोहतकार,अश्विन कारोकार,तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …