Breaking News

*इंदर कोळसा खदान चा चोरी केलेला कोळसा पकडला* *वराडा येथील शेतातुन चोरीचा कोळसा पकडुन ३२,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*इंदर कोळसा खदान चा चोरी केलेला कोळसा पकडला*

*वराडा येथील शेतातुन चोरीचा कोळसा पकडुन ३२,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस ६ किलो मीटर अंतरावर असलेल्या वराडा शिवारात राहुल सिंग यांच्या शेतात आरोपी भुजंग महल्ले यांनी इंदर खुली कोळसा खदान येथील कोळसा चोरी करून जमा केल्याच्या माहीतीने वेकोलि प्रभारी सुरक्षा अधिकारी संतोष यादव यांनी घटनास्थळी पोहचुन कन्हान पोलीसांना तक्रार करून ६४९० किलो कोळसा किंमत ३२ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केल्याने कन्हान पोलीसांनी आरोपी भुजंग महल्ले विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार दिनांक.६ फेब्रुवारी २०२२ ला रात्री ९ ते ९:३० वाजता दरम्यान वेकोलि प्रभारी सुरक्षा अधिकारी संतोष इंद्रासेन यादव वय ३८ वर्ष राहणार. कामठी काॅलरी, मडीबाबा खदान नंबर.३ आणि सुरक्षा रक्षक सिराजुद्दीन अंसारी हे वराडा गावाजवळ पेट्रोलिंग करीत असतांना राहुल सिंग नावाच्या व्यक्ती ने माहिती दिली कि, वराडा गावा जवळील त्यांचा शेतात अवैध कोळसा जमा केलेला असुन हा कोळसा इंदर खुली कोळसा खदान येथुन चोरी करून जमा केलेला आहे. या माहिती वरून सुरक्षा अधिकारी संतोष यादव हे आपल्या सुरक्षा रक्षक सिराजुद्दीन अंसारी सोबत राहुल सिंग यांचा शेतात जाऊन पाहणी केली. तर तेथे‌ कोळश्या चा ढिग एका बाजुला दिसला. तेव्हा राहुल सिंग कडुन कळले की, जमा असलेला शेतातला हा कोळसा अवैद्य कोळसा टाल चालक भुजंग महल्ले वय ४८ वर्ष राहणार. टेकाडी यांचा असल्याचे खात्रीशीर माहीती वरून सुरक्षा अधिकारी संतोष यादव यांनी इंदर खुली खदान मधुन ट्रक आणि पे लोडर च्या मदतीने शेतातील कोळसा ट्रक मध्ये भरून खदान च्या वजन काट्यावर वजन केला असता कोळस्याचे वजन ६४९० किंमत ३२,००० रुपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी संतोष इंद्रासन यादव सुरक्षा अधिकारी यांच्या तोंडी तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी आरोपी भुजंग महल्ले च्या विरुद्ध अपराध. क्रमांक ५२/२०२२ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …