*मडीबाबा येथे दोन आरोपींनी महिलेला लाकडी दंड्याने मारून केले जख्मी*
*फिर्यादी महिलेच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिम तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या खदान नंबर. ३ माडीबाबा येथे दोन आरोपींनी महिलेला लाकडी दंड्याने मारून जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरुन दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांक.५ फेब्रुवारी २०२२ ला रात्री ८ वाजता दरम्यान उषा रामचंद्र मौर्य वय ३५ वर्ष राहणार. कोळसा खदान नंबर. ३ हे आपल्या घरी स्वयंपाक करित असतांना त्यांच्या घराच्या गल्ली मध्ये जोंगिंदर तिवारी वय ४० वर्ष राहणार. कोळसा खदान नं.३ कन्हान यांचा लहान मुलगा आणि उषा मौर्य यांचा ३ वर्षाचा मुलगा हे दोघे ही खेळत असतांना दोघां मध्ये झगडा झाल्याने मोठ्या मुलींनी सांगितले कि मुलां मुलांचे भांडण होत आहे. तेव्हा उषा मौर्य हे लहान मुलांना समझविण्याकरिता बाहेर आली असता जोगिंदर तिवारी यांची पत्नी सोना जोंगिदर तिवारी वय ३५ वर्ष राहणार. खदान नंबर. ३ हिने महिलेला शिविगाळ करीत होती. तेव्हा उषा रामचंद्र मोर्य हिने आरोपी सोना जोंगिदर तिवारी हिला विचारले की, तु शिवी का बर देत आहे. तेव्हा जोंगिदर हा घराच्या बाहेर आला व शिविगाळ करून जोगिंदर तिवारी व सोना जोंगिदर तिवारी हे दोघे ही घरात गेले व घरातुन लाकडी दंडा आणुन उषा रामचंद्र मौर्य हिच्या हातावर व पाठीवर मारून गंभीर दुखापत केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी उषा रामचंद्र मोर्य हिच्या तोंडी तक्रारी वरून जोगिंदर तिवारी व सोना जोंगिदर तिवारी या दोन आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक. ४८/२०२२ कलम ३२४, ५०४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.