*निमखेडा येथे वंधत्व निवारण शिबीर थाटात संपन्न*

*शिबीरात ७४ जनावरांची केली तपासणी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – साटक पंचायत समिती पारशिवनी अंतर्गत मौजा निमखेडा येथे विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प अंतर्गत विशेष वंधत्व निवारण शिबीरा चे आयोजन करून शिबारात ७४ जनावरांची तपासणी करून शिबीर थाटात संपन्न करण्यात आले .

विदर्भ, मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प अंतर्गत विशेष वंधत्व निवारण शिबीर पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी साटक पंचायत समिती पारशिवनी व्दारे पंचायत समिति साटक च्या मौजा निमखेडा येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन शिबीराचे उद्घाटन सरपंचा सौ कलावती तडस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दुग्ध विकास प्रकल्प समन्वय डॉ शैलेंद्र पुरी यांनी पशु पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले. सहयोगी प्राध्यापक नागपुर पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ अजय गावंडे, पशुधन विकास अधिकारी डॉ अविनाश ब्राम्हण कर व डॉ मनोहर लाडुकर यांनी ७४ जनावरांची तपासणी करून उपचार केला .

शिबीरात पारशिवनी तालुका पशु विकास अधिकारी डॉ गणेश ठाकुर यांनी पशु पालकांना किसान क्रेडिट कार्ड योजना व पशु संवर्धन विभागातील योजनेची माहिती देऊन शिबीर थाटात संपन्न करण्यात आले. या प्रसंगी उपसरपंच देवाजी डोंगरे, सहादेव मेंघरे, सुभाष तडस, राजु कामडी सह नागरिक उपस्थित होते. शिबीराच्या यशस्वीतेकरिता मदर डेयरी क्षेत्रीय अधिकारी अनिल सिंह, लिडर डॉ समीर मृदुली, सुपरवाइजर ईश्वर कारेमोरे, सहायक सखाराम मदनकर आदीचे सहकार्य लाभले. पशु विकास अधिकारी डॉ टेकाम, डॉ प्रिती वाळके, डॉ चिमोटे, संतोष तुपट, सुहास पुंड, महेश मेश्राम, पानुर कर, चावके, एल आर पी आकाश थोटे यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शिबीरा बाबत माहिती देऊन शिबीर यशस्वी केले.
Maharashtra News Media सच की आवाज