Breaking News

मुलचेरा येथिल धन्नूर येथे गोल्डन कार्ड वितरण..

*गोल्डन कार्ड वितरीत*
*अनेकांनी घेतला लाभ*

गडचिरोली :- दि.24/11/2019 तालुका मुलचेरा येथिल धन्नूर येथे गोल्डन कार्ड वितरण

दिनांक 24 नोव्हेंबर धन्नूर येथे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जण आरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड वितरण कार्यक्रम घेण्यात आला, या कार्यक्रमाचे अध्यक्षा. सौ.भावनाताई कुसनाके पोलिस पाटील आणि प्रमुख आतिथी डॉ. गेडाम सर वैद्यकीय अधिकारी, लगाम तसेच दीपक कुसनाके, नामदेव कुसनाके, जैराम कनाके उपस्थित होते,यांच्या हस्ते गोल्डन कार्ड चे वितरण करण्यात आले.आणि या योजनेची माहिती सविस्तर सांगण्यात आली.या कार्यक्रमाचे नियोजन श्री मनोज उराडे जिल्हा पर्यवेक्षक (आयुष्यमान भारत), श्री. मनोज तोरे आरोग्यमित्र, आशा वर्कर सुरेखा कुसनाके यांनी केले.तसेच महाराष्ट्र न्युज मीडिया चे जिल्हा प्रतिनिधी श्री. सुरज सर उपस्थित होते.
केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जण आरोग्य योजना हिलाच मोदी केअर या नावाने ओळखले जाते या योजने अंतर्गत लाभार्थ्यांला ५लाखा पर्यंत च्या १३०० आजारांवर शस्त्रक्रिया व उपचार मोफत आहेत. त्या करिता लाभार्थ्यांचे नाव सामाजिक, आर्थिक, जातनिहाय जनगणना २०११ मध्ये नाव असणे आवश्यक आहेत.तसेच लाभार्थथा कडे प्रधानमंत्री पत्र पाठविलेले आहेत. हे पत्र किंवा रेशन कार्ड सोबत, आधार कार्ड च्या आधारे गोल्डन कार्ड किंवा आयुष्यमान भारत कार्ड त्या लाभार्थ्यांला बनवायचे असते. या मुळे सर्व दुर्गम,गरीब,असुरक्षित लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
या योजनेचे कार्ड बनविण्या करीता आयुष्यमान भारत मदत केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर,तसेच योजने अंतर्गत संलग्नित रुग्णालयात गोल्डन कार्ड बनविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्या साठी नाममात्र ३० रुपये शुल्क असून त्या पेक्षा अधिक रक्कम घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
प्रधानमंत्री जण आरोग्य योजना म्हणजेच आयुष्यामन भारत योजनेचे गोल्डन कार्ड जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी काढावे असे आवाहन करण्यात आले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …