*कन्हान येथे भव्य रांगोळी स्पर्धे चे आयोजन*

*कन्हान नगर परिषद द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहरात व परिसरात आज मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्य विविध संघटने द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कन्हान – पिपरी नगरपरिषद द्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त माझी वंसुधरा अभियान २.० अंतर्गत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन शिवाजी पुतळा , शिवाजी नगर येथे करण्यात आले आहे .

शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्य कन्हान – पिपरी नगरपरिषद द्वारे माझी वंसुधरा अभियान २.० अंतर्गत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन शिवाजी पुतळा , शिवाजी नगर येथे सकाळी ७:०० वाजता पासुन तर सकाळी ९:०० वाजता पर्यंत करण्यात आले आहे . या नंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असुन या मध्ये प्रथम बक्षीस २,००० रु. रोख , सम्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक द्वितीय बक्षीस १००० रु.रोख , सम्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक तृतीय बक्षीस ५०० रु.रोख , सम्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक हे सर्व भाग घेणाऱ्या स्पर्धकांना नप नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर व मुख्याधिकारी संदिप बोरकर यांच्या हस्ते सम्मानचिन्ह तसेच प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात येईल .
या भव्य रांगोळी स्पर्धे जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावे असे कडकडीचे आव्हाहन मुख्याधिकारी संदिप बोरकर , नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , उपाध्यक्ष डायनल शेंडे , संकेत तलेवार , नगरसेवक अनिल ठाकरे नगरसेविका मौनिका पौणिकर सह आदि ने केले आहे .
Maharashtra News Media सच की आवाज