Breaking News

*कन्हान येथे भव्य कन्हान प्रीमियर लीग फ्रेश आर्म ओपन टेनिस बॉल टूर्नामेंट चा शुभारंभ* *जय मानवता सार्वजनिक बहुद्देशीय संस्था तर्फे भव्य कन्हान प्रीमियर लीग फ्रेश आर्म ओपन टेनिस बॉल टूर्नामेंट चे आयोजन*

*कन्हान येथे भव्य कन्हान प्रीमियर लीग फ्रेश आर्म ओपन टेनिस बॉल टूर्नामेंट चा शुभारंभ*

 

*जय मानवता सार्वजनिक बहुद्देशीय संस्था तर्फे भव्य कन्हान प्रीमियर लीग फ्रेश आर्म ओपन टेनिस बॉल टूर्नामेंट चे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्य जय मानवता सार्वजनिक बहुद्देशीय संस्था कन्हान द्वारे भव्य कन्हान प्रीमियर लीग फ्रेश आर्म ओपन टेनिस बॉल टूर्नामेंट चे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत भव्य क्रिकेट टूर्नामेंट चा शुभारंभ करण्यात आला .
शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्य जय मानवता सार्वजनिक बहुद्देशीय संस्था कन्हान द्वारे भव्य कन्हान प्रीमियर लीग फ्रेश आर्म ओपन टेनिस बॉल टूर्नामेंट चे आयोजन तेजाब ग्राउंड पोलीस स्टेशन च्या मागे करण्यात आले असुन या भव्य क्रिकेट टूर्नामेंट चा शुभारंभ रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते व रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने , तहसीलदार प्रशांत सांगडे , कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे , सामाजिक कार्यकर्ता रामेश्वरजी बावनकर , नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , जय मानवता सार्वजनिक बहुद्देशीय संस्था कन्हान चे अध्यक्ष वर्धराज पिल्ले यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत भव्य क्रिकेट टूर्नामेंट चा शुभारंभ करण्यात आला असुन या भव्य क्रिकेट टूर्नामेंट मध्ये नागपुर , कामठी , कोराडी सह विविध ठिकाण्याहुन आलेल्या ३० क्रिकेट संघाने सहभाग घेतला आहे . या भव्य क्रिकेट टूर्नामेंट च्या पहिला सामना अण्णा टीम कामठी आणि जगदंबा टीम कन्हान मध्ये खेळला गेला या सामन्यात जगदंबा टीम कन्हान ने उत्तम कामगिरी बजावत पहिला सामना जिंकला असुन दुसरा सामना किंग्स कन्हान आणि एम एच ४९ टीम नागपुर मध्ये खेळला गेला हा सामान किंग्स कन्हान ने जिंकला असुन तिसरा सामना जगदंबा टीम कन्हान आणि किंग्स कन्हान
मध्ये खेळला गेला हा सामान जगदंबा टीम कन्हान ने जिंकल्याने मॅन आॅफ द मैच पुरस्कार जगदंबा टीम कन्हान चे खेळाडु सागर राऊत यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले .


शहरात बऱ्याच दिवसा नंतर क्रिकेट टूर्नामेंट चे आयोजन करण्यात आल्याने टुर्नामेंट च्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करुन टुर्नामेंट चा आनंद घेतला .या भव्य क्रिकेट टूर्नामेंट मध्ये फाईनल विजेता टीम ला प्रथम बक्षीस ५१,००० रुपए आणि सन्मान चिन्ह रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.श्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते व उपविजेता टीम ला द्वित्तीय बक्षीस २५,००० रुपए आणि सन्मान चिन्ह , कन्हान नवरात्र गरबा महोत्सव यांच्या हस्ते वाटप होणार असुन बेस्ट बैट्समैन , बेस्ट बॉलर , हैट्रिक , मैन ऑफ द मैच मान्यवरांचा हस्ते वाटप होणार आहे .


या भव्य क्रिकेट टूर्नामेंट चा शुभारंभ कार्यक्रमात रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने , आमदार आशिष जयस्वाल , तहसीलदार प्रशांत सांगडे , कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे , सामाजिक कार्यकर्ता रामेश्वरजी बावनकर , नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , उपाध्यक्ष डायनल शेंडे , जय मानवता सार्वजनिक बहुद्देशीय संस्था कन्हान चे अध्यक्ष वर्धराज पिल्ले , नगरसेवक अनिल ठाकरे , राजेश यादव नगरसेविका मौनिका पौणिकर , कृषणकुमार अग्रवाल , पी.डी जैसवाल , दामोदर बंड , छोटु राणे , चिंटु वाकुडकर , हरीष तिडके , अजय चव्हान , भरत पगारे , प्रकाश तिवारी , मोती हारोडे , मनिषा चिखले , वैशाली श्रीखंडे , कोमल लांजेवार , लीना हारोडे , लता लुंढेरे , शुभांगी घोघले , सोनु खान , शुभम येलमुले , समशेर पुरवले , उमेश पौणिकर , सुनिल पिल्ले , उमेश पुरवले , प्रदीप गायकवाड , अनिल चौरसिया , तौषिक बावनकर , तनिष्क पिल्ले , निखिल नागवाशी , रितेश दमाये , सुरज गणवीर , शाहरुख खान सह आदि शिवसैनिक , व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …