Breaking News

*सावनेर येथे आँनलाईन लाटरी व कँसीनो मनोरंजनाच्या नादी उध्वस्त होतोय् युवा व विद्यार्थी वर्ग*

*आँनलाईन लाटरी व कँसीनो मनोरंजनाच्या नादी उध्वस्त होतोय् युवा व विद्यार्थी वर्ग*

*कँसीनो मनोरंजन म्हणजे काय याला परवानगी कुणाची व कशी*

*मुख्य संपादक -किशोर ढुंढेले*

*सावनेरः सावनेर शहरात मोक्याच्या ठिकाणी जवळपास 10 च्या वर आँनलाईन लाटरी सेंटर व ईलेक्ट्रानीक कँसीनो सेंटर च्या आड मनोरंजनाच्या नावावर राजरोस पणे जुगार खेळल्या जात आहे व या अवैध व्यवसायात शालेय विद्यार्थी व युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्या जीवनाचे वाटोळे करत असल्याचे चित्र आहे*
*मिळालेल्या माहीती नूसार सावनेर शहरात जवळपास दहाच्या वर असे कँसीनो सेंटर असून यात दररोज लोखोची रोख उलाढाल होत असुन सकाळ पासुन ते रात्री पर्यंत या कँसीनो सेंटर वर विद्यार्थी व युवा मंडळीची गर्दी असते.*
*विश्वस्त सुत्रादारे मिळालेल्या माहिती नुसार सदर कँसीनोतील इलेक्ट्रॉनिक मशीनीत तांत्रिक बिगाड करुण खेळणार्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्यात जात आहे खेळनारा “शंभर रुपये हारला तरी जिंकतो मात्र दहा रुपये” या पध्दतीने मशीनी सेट केल्याने हराणारा दररोज हजारो हारतो तर संचालक दररोज लाखोची माया गोळा करतो.एखादा नशीबवान पाच पंचवीस हजार जिंकला तर संचालक व त्याचे पोसलेले हस्तक त्यास जीतलेली रक्कम न देता हाकलुन लावतात किंवा “मशीन बरोबर नही है,फीर से खेल” असे म्हणत दमदाटी करुण त्यास जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा दील्या जात असल्याचे वु्त्त आहे*

*शहरात सुरु असलेल्या या कँसीनो व्यवसायास कुणाची मान्यता आहे…?,

*या व्यवसायावर कुणाचे नियंत्रण आहे…?,

*कँसीनो मधे असलेल्या इलेक्ट्रॉनिक मशीनी या संबंधीत विभागाने पुरविल्या आहेत काय…?,

*त्या शासकीय मान्यता व इतर गुणवत्ता प्राप्त आहेत काय…?

*सदर कँसीनो सेंटर मधील प्रत्यक मशीन दररोज कीती लोकांचे मनोरंजन करते व त्यातून दररोज कीती मनोरंजन कर शासनाच्या तीजोरीत कुठे व कसा जमा होतो…?

आँनलाईन लाटरी व कँसीनो व्यवसायीक दररोज मनोरंजन कर शासनाच्या राजस्व विभागाकडे जमा करतात काय…?,सदर कँसीनो गु्हाचे माहवारी,तीमाही अथवा वार्षिक आँडीट होते काय…?व असे अवैध व्यवसाय कुणाच्या आशीर्वादाने फुलत आहेत असे अनेक प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात असून राजरोस पणे सुरू असलेल्या या व्यवसायावर संबंधित विभागानी योग्य कारवाई करुण ज्या ज्या ठिकाणी मशीनी मधे तांत्रिक गडबडी करुण अवैध रीत्या गडगंज माया गोळा करणार्यांनवर योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे*

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …