*कोंढाळी-नागपुर महामार्ग वर ट्रेलर व कार चा अपघात* *कार मधील तिघांचा मृत्यू* *चार महिन्याच्या चिमुकल्यासह पित्याचा अपघातात जागीच मृत्यू उपचारादरम्यान आई चा ही मृत्यू*

*कोंढाळी-नागपुर महामार्ग वर ट्रेलर व कार चा अपघात*

*कार मधील तिघांचा मृत्यू*

*चार महिन्याच्या चिमुकल्यासह पित्याचा अपघातात जागीच मृत्यू
उपचारादरम्यान आई चा ही मृत्यू*

कोंढाळी वार्ताहार –  दुर्गाप्रसाद पांडे
कोंढाळी – येथून 13 की मी अंतरावरील नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गवर बाजारगाव नजिक आज दुपारी 12 :30 वाजता उभ्या असलेल्या कंटेनर(ट्रेलरला) कोंढाळीवरून जाणाऱ्या कार ने जोरदार धडक दिल्याने या धडकीत कार चालक रोशन रामजी तागडे 28 व दीड पाच महिन्याच्या मुलगा राम रोशन तागडे या पित्या पुत्राचा जागीच मृत्यू झाला ,तर पत्नी आचल रोशन तागडे 23 चा नागपुर येथील शासकीय रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.तर
जया अशोक मेश्राम (8) गंभीर जखमी चा नागपूर रुग्णालयात मृत्यूशी झुज देत आहे .


प्राप्त माहितीनुसार रोशन रामाजी तागडे हे सध्या नागपूर येथे खाजगी ट्रक चालक म्हणून काम करीत होता तो नातेवाईकाच्या लग्नाकरिता दि 18 फेब्रुवारी ला पत्नी, मुलगा व पुतनी कुटूंबासह कोंढाळीला कार ने आला होता लग्न कार्यक्रम आटपून आज 19 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता कोंढाळी वरून नागपूरला कार क्र MH 49 F 0875 ने नागपुर कडे जात होता.या दरम्यान बाजारगाव येथील एका ढाब्या लगत मालवाहक ट्रेलरचालकाने आपले वाहन क्र MH40BL4254 ढाब्या लगत उभा केलाअसता मागून येणार्या कार चालक रोशनने आपल्या वाहनाचे अचानक ब्रेक लावल्याने कार फिरून कंटेनारमध्ये घुसली असता कारचा पुर्णतः चकनाचूर झाली. यात कारचालक पिता पुत्रा चा जागीच मृत्यू झाला तर पत्नी आचल रोशन तागडे हीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पुतनी जया गंभीर जखमी ला
वसंतराव देशमुख प्रतिष्ठाणचे रुग्णवाहिका चालक संजय गायकवाड व प्रफुल तातोडे यांनी जखमींना नागपूर मेडिकल येथे उपचाराकरिता नेले घटनेची माहिती कळताच ठाणेदार चंद्रकांत काळे ASI भोजराज तांदुळकर व कर्मचारी यांनी घटना स्थळी धाव घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत करून घटना पंचनामा केला तसेच कंटेनर ड्रायव्हर राजेश ठवरे 45 नागपूर यांला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविला व पुढील तपास ए एस आय अजीत कदम करीत आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …