*सालवा येथुन बकऱ्या च्या गोट्यातुन २२ बकऱ्या चोरी* *फिर्यादी च्या तक्रारीने कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*सालवा येथुन बकऱ्या च्या गोट्यातुन २२ बकऱ्या चोरी*

*फिर्यादी च्या तक्रारीने कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस ११ किलो मीटर अंतरावर असलेल्या मौजा सालवा येथे घराच्या बाजुला असलेल्या बकऱ्याच्या गोट्यातुन कोणीतरी अज्ञात आरोपी ने २२ बकऱ्या चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारीने कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी हनुमंता रामरावजी वैद्य राहणार. सालवा हा बकरी पालनाचा व्यवसाय करीत असुन मंगळवार (दि.२२) फेब्रुवारी ला रात्री ३ वाजता दरम्यान हनुमंता वैद्य यांच्या घराच्या बाजुला असलेल्या बकऱ्याच्या गोट्याचे फाटक उघडुन २२ बकऱ्या किंमत २,६०,००० रुपयांच्या मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी हनुमंता रामरावजी वैद्य यांच्या तोंडी तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४६१, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आरोपीचा शोध घेत आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …