*टेकाडी , गोंडेगाव ते जामसावळी श्री हनुमान पालखी पदयात्रेेचे प्रस्थान*
*विविध ठिकाणी श्रीराम भक्तांनी फुलाच्या वर्षावाने केले भव्य स्वागत*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहरा पासुन ३ किलो मीटर अंतरावर असलेल्या टेकाडी गावातुन दरवर्षी प्रमाणे टेकाडी , गोंडेगाव ते जामसावळी श्री हनुमान पालखी पायी पदयात्रा श्री हनुमान मंदीर टेकाडी ला महाआरती व प्रसाद वितरण करून गाव भ्रमण करित टेकाडी येथुन जामसावळी पदयात्रेचे रस्त्यात विविध ठिकाणी श्रीराम व श्री हनुमान भक्तांनी फुलाच्या वर्षाव, चाय व अल्पोहार वितरित करून भव्य स्वागत करून हर्षोल्लोहासात पदयात्रेचे जामसावळी करिता प्रस्थान करण्यात आले.

गुरूवार दिनांक .२४ फेब्रुवारी २०२२ ला श्री हनुमान मंदीर टेकाडी व ग्रामवासीया व्दारे टेकाडी, गोंडेगाव ते जामसावळी श्री हनुमान पालखी पदयात्रा श्रीराम व श्री हनुमान भक्तांनी आठव्या वर्षी टेकाडी येथील श्री हनुमान मंदिरात पालखी पदयात्रेचे माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव व श्री हनुमान मंदीर कमेटी अध्यक्ष पंढरीजी बाळबुधे यांच्या हस्ते पुजन , महाआरती व परिसरात प्रसाद वाटप करून पदयात्रा सुरूवात करित गाव भ्रमण करून टेकाडी येथुन निघाली असता नागपुर , जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर सावजी भोजनालय , जय दुर्गा मंगल कार्यालय येथे श्रीराम भक्तांनी फुलाच्या वर्षावाने स्वागत व अल्पोहार वितरित करून पदयात्रा कांद्री, तारसा रोड चौक, आंबेडकर चौक होत ब्रुक बाॅंड गेट कन्हान समोर आली असता श्रीराम व श्री हनुमान च्या जयघोषात पालखी पदयात्रेचे फुलाच्या वर्षाव व अल्पोहार , चाय वितरण करून हर्षोल्लोहासात स्वागत करून पदयात्रेचे कामठी मार्गे जामसावळी करिता प्रस्थान करण्यात आले.
या प्रसंगी रामटेक लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव , पंढरी बाळबुधे , दिलीप राईकवार , मनोज लेकुळवाळे , किशोर पांजरे , उपसरपंच श्यामकुमार बर्वे , सचिन साळवी , नंदु लेकुळवाळे , कमलसिंह यादव , सतिश घारड , ॠषभ बावनकर , दादाराव राऊत , हरिश्चद्र हुड , प्रकाश तिमांडे , गौरव भोयर , आस्तिक चिंचुलकर , शिव नारायण आकोटकर , उमेश भोयर , नितीन ओमरे , अशोक राऊत , निलेश गाडवे , केतन भिवगडे सह प्रामुख्याने बहु संख्येने मान्यवर उपस्थित होते. टेकाडी ,गोंडेगाव ते जामसावळी तीन दिवसीय पालखी पदयात्रेच्या यशस्वितेकरिता नथुजी मोहाडे , गोपीचंद बुराडे , मनोज गुडधे , सुरेश खोरे , रविंद्र मोरे , राजु शेंदरे , कैलास राऊत , देवराव लेकुळ वाळे , वासुदेव नागोते , बदली प्रसाद , देवराव सातपैसे , टेकाडी ग्रामपंचायत माजी सरपंचा सुनिता मेश्राम , अंजनी उमाळे , पारबती भेलावे , शकुंतला गाडगे , शशीकला राऊत , चंद्रकला आमले , प्रेमलता काठोके , मिराबाई राऊत , बेबीबाई राऊत , निर्मला हुड , मैनाबाई राऊत , कांताबाई नागपुरे , वनिता सातपैसे , कांताबाई नाकतोडे , माधुरी उमाळे सह समस्त टेकाडी , गोंडेगाव ग्रामवासी सहकार्य करित आहे .
Maharashtra News Media सच की आवाज