*जुनीकामठी शिव मंदिरात दोन दिवसीय कार्यक्रमाने महाशिवरात्री महोत्सव थाटात साजरा*

*” हर हर महादेव”, ” बंम बंम भोले” च्या जयघोषात नागरिकांची पुजा , अर्चना संपन्न*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहरा पासुन काही किलो मीटर अंतरावर असलेल्या जुनी कामठी येथे कामठेश्वर शिव मंदिरात महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो परंतु मागील दोन वर्षा पासुन कोरोना चा प्रादुर्भाव असल्याने नागरिकांनी घरीच पुजा अर्चना केली होती. परंतु या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने शासनाचे निर्बंध शिथील असल्याने जुनीकामठी पुरातन कामठेश्वर शिव मंदीरात सकाळ पासुन नागरिकांनी पुजा अर्चना केली व दोन दिवसीय विविध कार्यक्रमाने महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला .
मंगळवार दिनांक .१ मार्च २०२२ ला महाशिवरात्री महोत्सव निमित्य जुनीकामठी कामठेश्वर शिव मंदीरात सकाळी ४ वाजता विशेष यजमानांच्या हस्ते कामठेश्वर शिवालयाचे विद्वान पंडित च्या हस्ते अभिषेक व सामुहिक आरती ने कार्यक्रमाची सुरूवात करित भजन कीर्तन कार्यक्रम करण्यात आला . या महाशिवरात्री निमित्य परिसरातील नागरिकांनी जुनीकामठी कामठेश्वर मंदिरात शिवलिंग वर दुध, दही चा अभिषेक करून बेलबत्ती, पुष्प वाहुन पुजा अर्चना केली . दुसऱ्या दिवशी बुधवार दिनांक २ मार्च ला दहिकाला कार्यक्रम करुन व महाप्रसाद वितरण करुन महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला .

या प्रसंगी जीजाताई आसोले , गजानन आसोले , बाबुलालजी हिरणवार , प्रकाश हिरणवार , अनिल गंडलिया , प्रकाश हिरीया , उत्तम सहारे , विजय लांजेवार , सोनुजी पिल्ले , भुषण इंगोले , गुलाबराव डेंगे सह आदि नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहुन सहकार्य केले .
Maharashtra News Media सच की आवाज