Breaking News

*जय भोले शिव मंदीर वराडा येथे महाप्रसाद संपन्न*

*जय भोले शिव मंदीर वराडा येथे महाप्रसाद संपन्न*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – जय भोले शिव मंदीर पंचकमेटी वराडा व्दारे महाशिवरात्री निमित्य शिव मंदीर वराडा येथे तीन दिवस पुजा, अर्चना , भजन, किर्तन व दहीकाला व ” हर हर महादेव “च्या जय घोषात महाप्रसाद वितरण करून महाशिवरात्री उत्साहाने थाटात साजरी करण्यात आली.


मंगळवार दिनांक.१ मार्च २०२२ ला जय भोले शिव मंदीर पंचकमेटी वराडा व्दारे महाशिवरात्री निमित्य शिव मंदीरातील शिव मुर्तीचा अभिषेक, पुजा अर्चना करून तीन दिवसीय महाशिवरात्री कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सायंकाळी महिला भजन मंडळानी भजन कार्यक्रम झाला. सोमवार दिनांक.२ ला बाहेर गावचे व वराडा येथील पुरूष व महिला भजन मंडळाचा भजन व महादेवा चे गाणे गायन करण्यात आले. बुधवार दिनांक.३ ला सकाळी पुजा अर्चना करून भजन, हभप ढोबळे महाराज यांचे किर्तन आणि दुपारी १ वाजता दहीहंडी फोडुन दहीकाला व कढईचा प्रसाद वितरण त्यानंतर सायंकाळी ४ वाजता पासुन महाप्रसाद वितरण करण्यात आला. या महाप्रसाद कार्यक्रमाच्या परिसरातील गावकऱ्यांनी शिव भोले मुर्ती दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. या प्रसंगी माजी कृउबास सभापती देविदास जामदार , माजी उपसभापती देवाजी शेळकी , देवाजी ठाकरे नांदगाव , वराडा सरपंचा विद्याताई चिखले , मनोहरराव हेटे , रामराव जामदार , धोंडबाजी चरडे , सुधाकर खिळेकर , अशोक वरठी , नारायणजी टाले आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता मारोतराव नागमोते, दिलीप चिखले, संजय नेवारे, दिवाकर जामदार, सुरेंद्र गिऱ्हे, नितीन हेटे, कृष्णाजी खिळेकर, संजय टाले, कैलास पुंड, निलेश चिखले, संजय मेश्राम, आशाराम चिखले, सुनिल जामदार, संदीप ठाकरे, प्रशांत चरडे, ईश्वर घोडमारे, मोरेश्वर सोनटक्के, मनोज क्रॉकेटवार, नरेंद्र चरडे, रविंद्र टाले, शुभम नागमोते, आकाश कोसरे सह जय भोले शिव मंदीर पंचकमेटी वराडा चे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थानी सहकार्य केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …