Breaking News

*कन्हान येथे महिला दिवस निमित्य विविध कार्यात कार्य करणाऱ्या महिलांचा व युवतींचा सत्कार* *कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान येथे महिला दिवस निमित्य विविध कार्यात कार्य करणाऱ्या महिलांचा व युवतींचा सत्कार*

*कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे ०८ मार्च जागतिक महिला दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथील समोर ग्रीन जीम परिसरात करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते सावित्रीबाई फुले , राजमाता जिजाऊ व झांसी ची रानी लक्ष्मीबाई यांचा प्रतिमेचे पुजन करुन व विविध कार्यात कार्य करणाऱ्या महिलांचा व युवतींचा सत्कार करुन जागतिक महिला दिवस थाटात साजरा करण्यात आला .


मंगळवार दिनांक ०८ मार्च जागतिक महिला दिवस निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथील समोर ग्रीन जीम परिसरात करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आयुषी चौधरी मॅडम , व प्रमुख अतिथि , डॉ सर्वत हैद्री मॅडम , नप नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर , माजी नप नगराध्यक्षा आशाताई पनिकर , मुख्याधिकारी विशाखा ठमके , शिक्षिका वर्षा सिंगाडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले , राजमाता जिजाऊ व झांसी ची रानी लक्ष्मीबाई यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिला दिवस निमित्य उपस्थितांना मार्गदर्शन केले .


यावेळी परमात्मा एक दानपट्टा निमखेडा चे सेजल बावने , उर्वशी मल्लेवार , साक्षी सुर्यवंशी , वंशीका वक्कलकर , एक वादळ प्रत्येक घरी राष्ट्रगान करिता कार्य करणारी छकुली वासाडे , माॅडलिंग शो मध्ये उत्कृष्ट कार्य करणारी कल्याणी सरोदे , प्राची नारनवरे ह्या युवतींचा आणि पिंकी श्रीवास्तव , सुनिता कारेमोरे , विशाखा बोरे ह्या अपंग महिलांचा मान्यवरांचा हस्ते नोटबुक , पेन व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .

त्यानंतर कार्यक्रमात उपस्थित सर्वांना अल्पोहार वितरण करुन जागतिक महिला दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान चे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी , सिस्टर फरहाणा सय्यद , जोगळेकर , श्रीमती कंभाले , श्रीमती श्वेता मेश्राम श्रीमती लील्ल्हरे , शिवभारत २४ चे पत्रकार निलेश गाढवे , सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार , केतन भिवगडे , अश्विन भिवगडे , संदीप चिंचुलवार , मोहन वखलकर , सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव सुरज वरखडे , सहसचिव प्रकाश कुर्वे , कोषाध्यक्ष महेश शेंडे , मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , सदस्य हर्ष पाटील , शाहरुख खान , हरीओम प्रकाश नारायण सह आदि मंच पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहुन सहकार्य केले .
कार्यक्रमाचे सूत्र संचालन महेंद्र साबरे यांनी केले तर आभार रुषभ बावनकर यांनी मानले .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …