Breaking News

*कन्हान पोलीसांनी अवैध गौवंश तस्करीचा कंटेनर पकडुन ६४ पशुना दिले जीवनदान* *मृत ५ गोवंश मिळाल्याने वाहनासह ३० लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त तर ३ आरोपी अटक*

*कन्हान पोलीसांनी अवैध गौवंश तस्करीचा कंटेनर पकडुन ६४ पशुना दिले जीवनदान*

*मृत ५ गोवंश मिळाल्याने वाहनासह ३० लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त तर ३ आरोपी अटक*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत ३ किलो मीटर अंतरावर असलेल्या बोरडा रोड कांद्री टोल नाका येथे कन्हान पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना गोपनिय माहीती मिळाल्याने पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन सापळा रचुन कांद्री टोल नाका समोरील बाजुने कंटेनर थांबवुन पाहणी केली असता त्यात ६९ गौवंश बैलांना कोंबुन भरून अवैधरित्या वाहतुक करित कत्तली करिता नेतांना पकडुन कंटेनर सह एकुण ३० लाख ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींना अटक करून एकुण ६४ गौवंश पशु ना जीवनदान देत ५ मृत बैलाचा अंतिम संस्कार करून ही कारवाई करण्यात आली.
पोलीस सुत्रा कडुन प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक.७ मार्च ला दुपारी १२:३० ते १.३० वाजता दरम्यान कन्हान पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक सतिश मेश्राम, पोलीस उपनिरिक्षक जावेद शेख हे आपल्या कर्मचाऱ्या सह सरकारी वाहनाने पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबीर द्वारे गुप्त माहीती मिळाली कि बोरडा रोड कांद्री शिवारातील टोल नाका जवळ एक कंटेनर येत असुन त्यातील गोवंशा ना चाऱ्या पाण्याची कोणतीही सोय न करता तोड, पाय बांधुन ठेवुन बैलांची वाहनात अवैधरित्या वाहतुक करित आहे . अशी माहीती खात्रीशीर असल्याने कन्हान पोलीसांनी दोन पंचासह घटनास्थळी पोहचुन वाहनांची पाहणी केली असता कंटेनर ट्रक क्रमांक.एचआर ५५ टी १२१४ मध्ये ६९ गौवंश बैलांना कोंबुन त्यांचे पाय व तोंड बांधुन चाऱ्या पाण्याची कोणतीही सोय न करता निर्दयतेने व क्रुरपणे कत्तलीकरिता काळ्या रंगाचे ३६ बैल, पांढऱ्या रंगाचे २३ बैल, लाल रंगाचे ५ बैल व ५ मृत बैल असे एकुण ६९ गौवंश कंटेनर मध्ये आढळुन आल्याने घटनास्थळी पंचनामा करून ६९ गौवंश बैल किंमत १०,३५,००० रूपए , कंटेनर ट्रक किंमत २०,००,००० अशा एकुण ३०,३५,००० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन ६४ जनावरे वाहनात भरून गो विज्ञान अनुसंधान केन्द्र, देवलापार गौशाळेत देऊन गौवंश बैलाना जिवनदान देण्यात आले. तर मृत ५ बैलांचा पशु वैद्यकीय अधिकारी देवलापार यांचे व्दारे श्वविच्छेदन करून बैलाचा अंतिम संस्कार करण्यात आला. सदर प्रकरणात कन्हान पोलीसांनी आरोपी १) मनोज कुंजीलाल मिना वय २८ वर्ष राहणार.परबतीलया सड़क, ता. सडक, जि. भोपाल, आरोपी २) जुनैद असलम खान वय २१ वर्ष, आरोपी ३) जावेद रूआब खान वय २२ वर्ष दोन्ही राहणार. भोरासा, ता बरेसिया, जि. भोपाल अश्या तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध फिर्यादी शिपाई मंगेश सोनटक्के यांच्या तक्रारीने अपराध क्रमांक ११८/२०२२ कलम ४२९, ३४ भांदवि, सह कलम ११८,११९ महा.पो.अधि., सहकलम ११(१) (ड) (५) प्राणी छळ अधि ., सहकलम ५ (अ) (१) (ब) (५) महा. प्राणी संर अधि. १९४६ अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे. सदर कारवाई कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांचे मार्गदर्शनात कार्यवाही सपोनि सतिश मेश्राम, उप निरीक्षक जावेद शेख, जैयलाल सहारे, शरद गिते, मंगेश सोनट क्के, आतिश मानवटकर, दिपक कश्यप, विशाल शंभरकर, निसार शेख, अजय भगत, बंटी गेडाम सह आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …