Breaking News

*कन्हान नगर परिषद द्वारे महिला दिवस थाटात साजरा* *विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा केला सत्कार*

*कन्हान नगर परिषद द्वारे महिला दिवस थाटात साजरा*

*विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा केला सत्कार*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद द्वारे जागतिक महिला दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन नवीन प्रशासकीय इमारत येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते महास्त्रियांच्या प्रतिमेचे पुजन करुन व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा केला सत्कार करुन जागतिक महिला दिवस थाटात साजरा करण्यात आला .


मंगळवार दिनांक ८ मार्च ला जागतिक महिला दिवस निमित्य कन्हान – पिपरी नगरपरिषद द्वारे कार्यक्रमाचे आयोजन नवीन प्रशासकीय इमारत येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांच्या हस्ते व उपविभागीय अधिकारी रामटेक चे वंदना सवरंगपते यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी , सावित्रीबाई फुले , राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित
उपविभागीय अधिकारी रामटेक चे वंदना सवरंगपते , बळीरामजी दखने हायस्कुल च्या मुख्याध्यापिका विशाखा ठमके , नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर सह आदि महिलांनी महिला दिवस निमित्य उपस्थितांना मार्गदर्शन केले . यावेळी कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित महिला बचत गट , आशा वर्कर सेविका , अंगणवाडी सेविका , महिला सफाई कर्मचारी , विधवा महिला व शहरातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा वृक्ष , शाॅल , व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमात माझी वंसुधरा ची शपथ घेण्यात आली असुन राष्ट्रगान गायन केले . कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व महिलांना अल्पोहार वितरित करुन जागतिक महिला दिवस थाटात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र चे वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी , डॉ आयुषी चौधरी , कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या नगरसेविका मौनिका पौणिकर , संगीता खोब्रागडे , सुषमा चोपकर , रेखा टोहणे , कल्पना नितनवरे , अनिता पाटील , वंदना कुरडकर , वर्षा लोंढे , मनिषा चिखले , लता लुंढेरे , मनिषा बेले , संकेत तलेवार , शुभम येलमुले , शुभम कळबांडे , आशिष पात्रे सह आदि नप अधिकारी, कर्मचारी , व महिला मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …