*न्यू तोतलाडोह,वरंभा परिसरात सिलाई, कढाई रोजगार प्रशिक्षण केंद्राचा उदघाटन सोहळा थाटात संपन्न*
*जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केले उदघाटन*
रामटेक प्रतिनिधी :- पंकज चौधरी
रामटेक – आदिवासी बहुल क्षेत्र म्हणून ओडखल्या जाणाऱ्या देवलापार जवळील न्यू तोतलाडोह,वरंभा या परिसरात इंडियन सोशल सर्विस युनिट ऑफ एज्युकेशन,नागपूर (ISSU) व कॉलेज ऑफ सोशल वर्क,कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने आजीविका संवर्धन परियोजना अंतर्गत तसेच जागतिक महिला दिनाच्या औचित्याने सिलाई,कढाई रोजगार प्रशिक्षण केंद्राचा उदघाटन सोहळा संपन्न झाले.हे प्रशिक्षण केंद्र कायमस्वरूपी स्वरूपाचे असल्याचे माहिती कार्यक्रमात बोलतांना मान्यवरांनी सांगितले.आदिवासी भागातील महिला वर्गांना दैनिक रोजगार प्राप्त व्हावे या उद्देशाने या आदिवासी भागात हे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे.प्रशिक्षण केंद्रात महिलांना सिलाई व कढाई यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे किचन गार्डन,गृह वाटिका,जल संवर्धन व शिक्षात्मक सहयोग यानुसार गावातील प्रत्येक व्यक्तींच्या घरी रोपवाटिका तयार करून त्यात उत्पादन होणाऱ्या फळ विकून व्यवसाय करावे, गावातील तलावाचे खोलीकरण व रुंदीकरण ग्रामस्थांच्या श्रमदानातून करू असे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ.रुबिना अन्सारी.प्राचार्य (समाजकार्य महाविद्यालय,कामठी),उदघाटक सौ.वीणाताई ढोरे.(सरपंच, ग्राम पंचायत न्यू तोतलाडोह),मुख्य अतिथी म्हणून श्रीमती.प्रतिभा अतकरे, सचिव (ISSU संस्था),श्री.नंदकिशोर पटीये-संरक्षण अधिकारी (महिला व बाल विकास विभाग, नागपूर),श्री.पंकज चौधरी. म.रा.मराठी पत्रकार संघ रामटेक सदस्य,(न्यूज रिपोर्टर,रामटेक),डॉ.प्रणाली पाटील,विनोद गजभिये,प्रा.निशांत माटे, एस.के.घोष,राजीव थोरात (अध्यक्ष, इश्यू संस्था.) उपस्तीत होते.कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रपाल मेश्राम यांनी तर राजीव थोरात यांनी प्रास्ताविक भाषण केले.व आभार प्रदर्शन ओमप्रकाश कश्यप यांनी केले.कार्यक्रमात गावातील अनेक महिलांनी उपस्तीती दर्शविली.
Maharashtra News Media सच की आवाज