*सेंट्रल बँकेच्या एटीएम मधुन अज्ञात आरोपी ने ९७,७४६ रूपए काढुन केली चोरी* *फिर्यादी कामडे च्या तक्रारीने अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल*

*सेंट्रल बँकेच्या एटीएम मधुन अज्ञात आरोपी ने ९७,७४६ रूपए काढुन केली चोरी*

*फिर्यादी कामडे च्या तक्रारीने अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस एक किलो मीटर अंतरावर असलेल्या सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया एटीएम मधुन कोणीतरी अज्ञात आरोपी ने ९७,७४६ रूपये काढल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांच्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी श्रीराम देवराव कांमडे यांचे सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा कन्हान येथे बँक खाते क्रमांक २३५३५४७८२३ चे बचत खाते असुन १० वर्षापासुन बॅंकेत व्यवहार सुरु आहे. शुक्रवार दिनांक .४ मार्च २०२२ ला बॅंकेत किसान क्राप्ट लोनचे पैसे भरण्याकरिता गेले असता पासबुक प्रिंट केली तर श्रीराम कांमडे यांचे बँक खाते नंबर. २३५३५४७८२३ मधील दिनांक.३१ डिसेंबर २०२१ ते मंगळवार दिनांक .१ मार्च २०२२ पर्यंत १८ वेळा एटीएम मधुन पैसे काढल्याचे दिसुन आले. एकंदरित कोणीतरी अज्ञात आरोपीने ९७,७४६ रुपये काढल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी श्रीराम देवराव कांबडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध ४२० भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …