*कन्हान नप नगराध्यक्षा च्या घरी जाऊन चाकु दाखवुन मुलींना शिविगाळ करित आईला पाहुन घ्यायची धमकी ,शहरातील पोलीसांच्या कार्यप्रणाली वर व सुव्यवस्थे वर प्रश्न निर्माण* *शिवसेना पदाधिकार्यांचे व स्थानिक नागरिकांचे कन्हान पोलीस स्टेशन ला घेराव , अवैध धंधे , असामाजिक तत्वास आळा घालण्याची मागणी*

*कन्हान नप नगराध्यक्षा च्या घरी जाऊन चाकु दाखवुन मुलींना शिविगाळ करित आईला पाहुन घ्यायची धमकी ,शहरातील पोलीसांच्या कार्यप्रणाली वर व सुव्यवस्थे वर प्रश्न निर्माण*

*शिवसेना पदाधिकार्यांचे व स्थानिक नागरिकांचे कन्हान पोलीस स्टेशन ला घेराव , अवैध धंधे , असामाजिक तत्वास आळा घालण्याची मागणी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांच्या घरी जाऊन त्याच्या दोन मुलीला एका आरोपीने चाकु दाखवुन शिवीगाळ देत तुझ्या आईला पाहुण घेईन अशी धमकी दिल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळखळ उडाली असुन शहरातील सुव्यवस्थे वर व कन्हान पोलीसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण झाल्याने सदर प्रकरणाबाबत कन्हान पोलीस स्टेशन ला करूणाताई आष्टणकर यांच्या लेखी तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार दिनांक.९ मार्च ला कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर हया वाढदिवसाच्या कार्यक्रमाला बाहेर गेल्या असता आरोपी शानु समशेर सिद्धिकी याच्या भावाने फोन करून सांगितले कि, माझा लहान भाऊ शानु हा तुमचा घरी चाकु घेऊन गेला आहे. त्याने आमचा घरी माझा व माझ्या वडिलावर चाकु उगरला आहे. त्यामुळे तातडीने नप नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर हया घरी पोहचल्या असता त्याच्या मुलीने सांगितले कि, शानु समशेर सिद्धिकी हयाने घरी येऊन आम्हा मुलींना धमकावुन आणि चाकु दाखवुन शिवीगाळ केली. आणि तुझ्या आईला पाहुण घेईन अशी धमकी देऊन निघुन गेला. त्यामुळे नप नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर हयानी कन्हान पोलीस स्टेशन गाठुन लेखी तक्रार केल्याने कन्हान पोलीसांनी आरोपी शानु समशेर सिद्धिकी यांचे विरुद्ध ४४७, ५०४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .

कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत शांती सुव्यवस्था कायम करण्याची महिला व नागरिकांची मागणी.

बुधवार दिनांक.९ मार्च २०२२ ला नगराध्यक्षा घरी नसतांना त्याच्या घरी आरोपी शानु सिध्द्दीकी ने जाऊन त्याच्या मुलींना चाकु दाखवुन धमकावित शिवीगाळ करून तुझ्या आईला पाहुन घेईन अशी धमकी दिली. हया घटनेमुळे कन्हान शहरातील सुव्यवस्थे वर व कन्हान पोलीसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण होऊन असाजिक तत्वाचा दिवसेन दिवस बोलबाला वाढुन जर कन्हान च्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा च्या घरी चाकु घेऊन धमकी देण्यास भिती नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असुन सुध्दा आरोपी ला पकडुन कडक कार्यवाही करतांना दिसत नसल्याने कन्हान नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांचे सह शिवसेनेच्या सैकडो पदाधिकार्यांनी व स्थानिक नागरिकांनी गुरूवार दिनांक १० मार्च ला रात्री ७ वाजता पोलीस स्टेशन चा घेराव करून उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान हयांच्याशी चर्चा करून गुन्हेगारास त्वरित पकडुन कठोर कार्यवाही करावी. तसेच कन्हान शहरात दिवसेन दिवस वाढणारे अवैद्य धंदे , अवैद्य रेती , कोळसा , अवैध नशे ली पदार्थ , जुआ , सट्टा , चोरी , गुन्हेगारी , असामाजिक तत्व यावर त्वरित अकुंश लावुन कन्हान शहरात शांती सुव्यवस्था कायम करण्यात यावी. अन्यथा जन आंदोलन करण्याचा इशारा देऊन कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कायदा सुव्यवस्था प्रस्तापित करण्याची मागणी बहु संख्येने उपस्थित महिला व नागरिकांनी केली आहे .
या प्रसंगी राजु भोस्कर , वर्धराज पिल्ले , छोटु राणे , चिंटु वाकुडकर , हरीष तिडके , अजय चव्हान , अनिल ठाकरे , समशेर पुरवले , भरत पगारे , समीर मेश्राम , शुभांगी घोघले , मोनिका पौनिकर , मनिषा चिखले , लता लुंढेरे , शैलेश दिवे , डायनल शेंडे , उमेश पौणिकर , सह आदि शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …