*कन्हान मध्ये भुखंड विक्रीत ग्राहकाची फसवणुक* *एकच भुखंड दोन व्यक्तींना विकुन फसवणुकी चा कन्हान पोस्टे ला दोघावर गुन्हा दाखल*

*कन्हान मध्ये भुखंड विक्रीत ग्राहकाची फसवणुक*

*एकच भुखंड दोन व्यक्तींना विकुन फसवणुकी चा कन्हान पोस्टे ला दोघावर गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – एकच भुखंड दोन वेगवेगळ्या व्यक्तींना विकुन मित्राने मित्राचीच फसवणूक केल्याचा प्रकार कन्हान मध्ये उघडकीस आला आहे. अशोक पाटील राहणार कन्हान असे तक्रारदाराचे नाव आहे. नगरसेवक राजेश यादव व त्यांचे बंधु संजु यादव यांच्यावर कन्हान पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .


कन्हान – पिपरी नगरपरिषद चे नगरसेवक व काॅंग्रेस पार्टी कन्हान शहर अध्यक्ष राजेश यादव यांची कांद्री शिवारात शेत जमीन आहे. त्यातील काही जमिनीवर २००३ ला त्यांनी ले-आऊट टाकले. प.ह. क्रमांक.१५, सर्वे क्रमांक.२४० मधील भुखंड क्रमांक.२६ चा ले-आऊट मालक राजेश यादव व अशोक पाटील यांच्यात साडेसातशे स्क्वेअर फिट भुखंडाचा पस्तीस हजार रुपयात सौदा झाला. २८ हजार रुपये अशोक पाटील यांनी राजेश यादव यांना लगेच दिले. व रजिस्ट्रीच्या वेळेस बाकीची रक्कम देण्याचे ठरविण्यात आले होते. काही दिवसा नंतर रजिस्ट्री करून देण्यासाठी अशोक पाटील यांनी राजेश यादव यांच्याकडे सतत तगादा लावला पण वेळ मारून नेता नेता पंधरा वर्षे उलटली. या दरम्यान जमिनीचे भावही वाढले. काही अटीवर अशोक पाटील यांनी तेथे घरही बांधले त्यामुळे पुन्हा दीड लाख रुपये देण्याची मागणी राजेश यादव यांनी अशोक पाटील यांच्याकडे केली. अशोक पाटील यांनी आणखी दीड लाख रुपये देऊन १३ ऑगस्ट २०१८ ला रजिस्ट्री करू न घेतली. १८ डिसेंबर २०२१ ला सातबारा काढला असता तोच भुखंड बसंत बन्सीलाल सराफ व निकुंज प्रशांत सराफ यांना अगोदरच म्हणजे २० फेब्रुवारी २०१० ला विकल्याचे लक्षात आले. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने अशोक पाटील यांनी कन्हान पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली. जवळ पास तीन महिन्यानंतर पोलिसांनी राजेश यादव व त्यांचे बंधु संजु यादव यांचेवर भादंवि ४२०, ३४, नुसार गुन्हा दाखल करून पोलीस चौकशी करीत आहे. अद्याप पर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. नगरसेवक राजेश यादव व तक्रारकरते अशोक पाटील हे दोघे एकेकाळी काँग्रेसमध्ये सोबत काम करायचे. त्यांची चांगली मैत्री होती. पाई पाई जमवुन भुखंड खरेदी करून स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या भुखंड धारकाच्या स्वप्नाचा मात्र या प्रकारामुळे चुराडा झाला आहे .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …