Breaking News

*महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना व्दारे स्वच्छता अभियान*

*महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना व्दारे स्वच्छता अभियान*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्याने ” स्वच्छ भारत अभियान ” अंतर्गत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पारशिवनी तालुका व कन्हान नगरपरिषद यांच्या सयुक्त विद्यमाने गांधी चौक ते रेल्वे स्टेशन रोड परिसरात स्वच्छता अभियान राबवुन लहान मुलांना स्पोर्टस किट वितरण करण्यात आली.


महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष मा. राहुल दुबाले व नागपुर जिल्हाध्यक्ष मा लालसिंग यादव यांच्या मार्गदर्शनातुन ” स्वच्छ भारत अभियान ” अंतर्गत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पारशिवनी तालुका व कन्हान नगरपरिषद च्या सयुक्त विद्यमाने गांधी चौक ते रेल्वे स्टेशन रोड परिसरात नगराध्यक्ष करूणाताई आष्टाणकर व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पारशिवणी तालुका अध्यक्ष निलेश गाढवे यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये नगरपरिषद कन्हान कर्मचारी आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पारशिवनी च्या चंमुनी स्वच्छता अभियान राबवित परिसराची स्वच्छता केली. स्टेशन रोड परिसर स्वच्छ करून लहान मुलांना खेळण्या करीता मैदान स्वच्छ करून मुलाना स्पोर्ट्स किट वितरित केली. या अभियानात राजे ग्रुप कन्हान चे विशेष सहकार्य लाभले असुन मोहन भाऊ वकलकर, केतन भिवगडे, अभिजित चांदुरकर, रितेश जनबंधु , जगदीश कुंभरे, शुभम यादव सह आदि ग्रामस्थानी सहकार्य केले .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …