Breaking News

तायवाडे महाविद्यालय महादूला – काेराडी येथील मराठी विभागातर्फे “लेखक आपल्या भेटीला” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

*आद्य क्रांतिकारक महात्मा फुले : डॉ विश्वनाथ शिंदे*

तायवाडे महाविद्यालय महादूला – काेराडी येथील मराठी विभागातर्फे “लेखक आपल्या भेटीला” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यावेळी सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक व संशोधक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ विश्वनाथ शिंदे व डॉ मदन कुलकर्णी उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ शरयू तायवाडे उपस्थित हाेत्या, यावेळी डॉ शिंदे यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना फातिमा शेख यांच्याही शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला, तर डॉ मदन कुलकर्णी यांनी महात्मा फुले यांनी केलेले शैक्षणिक कार्य आज स्त्री यांच्या प्रगतीच्या रूपानें दिसून येत असेल्याचे सांगितले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ काेमल ठाकरे यांनी केले तर आभार डॉ राजेंद्र वाटाणे यांनी मानले, यावेळी डॉ वकील शेख, डॉ वर्षा वैद्य, डॉ शरद डवरे व अन्य प्राध्यापक व विद्यार्थी माेठया प्रमाणात उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …