*कांद्री फुकट नगर नाल्या जवळुन चोरीचा १३ टन कोळसा पकडला*
*अवैद्य कोळसा टाल वरून ६५ हजार रूपयाचा कोळसा जप्त*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस चार किलो मीटर अंतरावर असलेल्या फुकट नगर कांद्री नाल्याजवळ अवैद्य कोळसा टालवर वेकोलि कामठी खुली खदानचा चोरी केलेला १३ टन दगडी कोळसा सुरक्षा रक्षक व कन्हान पोलीसांनी पकडुन जप्त केला तर अवैद्य कोळसा टाल चालविणारे दोन आरोपी घटनास्थळावुन पळुन गेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार गुरूवार दिनांक१७ मार्च २०२२ ला रात्री १ ते २ वाजता दरम्यान वेकोलि सुरक्षा अधिकारी संतोष यादव यांचे सुरक्षा रक्षक हे कन्हान पोलीसा सह खदान नं ३ ते कामठी खुली खदान परिसरात पेट्रोलिंग ड्युटी करीत असतांना फुकट नगर कांद्री नाल्याजवळ अवैद्य कोळसा टाल चालविणारे फारूख अब्दुल्ला शेख व चिंटु सिंग दोघेही राहणार फुकट नगर कांद्री-कन्हान हे सुरक्षा अधिकारी व पोलीसांना पाहुन पळुन गेले. सदर ठिकाणी जमीनीवर पडलेला चोरीचा कोळसा मजदुर व वेकोलिचे कर्मचारी च्या मदतीने पिक अप गाडी मध्ये भरून गोंडेगाव खुली खदान च्या वजन काट्यावर नेऊन वजन केले असता कोळस्या १३ टन वजन भरले असुन सदर कोळसाची किंमत अंदाजे ५,००० रुपये प्रति टन प्रमाणे एकुण ६५,००० रुपयाचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करून कोल डिपो मध्ये जमा करण्यात आला. फिर्यादी वेकोलि सुरक्षा अधिकारी संतोष इंद्रसेन यादव यांच्या तोंडी तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी आरोपी फारूख अब्दु ल्ला शेख व चिंटु सिंग दोघे ही राहणार फुकट नगर कांद्री-कन्हान यांचे विरुद्ध कलम ३७९ , ३४ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.