Breaking News

*पुतळा स्थापन करुण विरांगनेला वाहिली श्रद्धांजली* *नगरधन येथील उपक्रम*

*पुतळा स्थापन करुण विरांगनेला वाहिली श्रद्धांजली*

*नगरधन येथील उपक्रम*

रामटेक प्रतिनिधी :- पंकज चौधरी

रामटेक – शहर पासून 5 कि.मी. अंतर असलेल्या नगरधन येथे 20 मार्च 2022 रोज रविवार ला वीरांगना अमर रानी अवन्तिबाई लोधी यांची 164 वी पुण्यतिथी निमित्त त्यांचा पुतळा स्थापन करुण त्यांचा बलिदान दिवस साजरा करण्यात आला.ह्या वेळेस त्यानी केलेल्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या लडाईचे तसेच देशासाठी दिलेल्या बलिदानची गाथा सांगण्यात आली.
पुतळ्याचे अनावरण तत्कालीन नगरधन सर्कलचे जि.प.सदस्य श्री.दुधराम सव्वालाखे तसेच प.स.सदस्य सौ.अस्मिता बिरणवार यांच्या हस्ते करण्यात आले.


तसेच कार्यक्रमाला गावातील उपसरपंच अनिल मुटकुरे,ग्रा.प सदस्या मंगला लिल्हारे, रूपा अजबैले, वंदना बिरणवार तसेच नंदिवर्धन विद्यालयाचे प्राचार्य श्री दीपकजी मोहड़,तसेच रमेश बिरनवार, मनोज चिंचोलकर,अमोल मुटकुरे, सारंग बिरंनवार, टीकाराम महुले, ईश्वर मसुरके, रामसिंग ससुरके, तसेच शेकडोच्या संख्येने समाज बांधव आणि गावकरी उपस्थित होते.
ह्या बलिदान दिवसाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रितेश बिरणवार व सजय बिरणवार यांनी संयुक्तपणे पार पाडले.व कार्यक्रमाला आलेल्या सर्व पाहुण्यांचे व लोकांचे आभार श्री रामचन्द्र दमाहे यांनी मानले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …