Breaking News

*कन्हान येथे महाड चवदार तळ समता सत्याग्रह दिवस साजरा* *वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान येथे महाड चवदार तळ समता सत्याग्रह दिवस साजरा*

*वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथे वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर द्वारे ९५ वा महाड चवदार तळ समता सत्याग्रह दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत महाड चवदार तळ समता सत्याग्रह दिवस साजरा करण्यात आला .
रविवार दिनांक २० मार्च ला ९५ वा महाड चवदार तळ समता सत्याग्रह दिवस निमित्य वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर द्वारे कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित वंचित बहुजन आघाडी शहर अध्यक्ष नितेश हरिचंद मेश्राम यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर प्रवक्ता रजनीश वामन मेश्राम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडी कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत महाड चवदार तळ समता सत्याग्रह दिवस साजरा करण्यात आला .


या प्रसंगी शैलेश ढोके , सोनू खोब्रागडे , रोहित कनोजिया , अखिलेश जी , सतीश ढबाले , पवन मेश्राम , मनीष नंदेश्वर , मनीष शंभरकर , मंगेश रंगारी सह आदि पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …