Breaking News

*कन्हान-कांद्री ला जगतगुरू संत तुकाराम महाराज बिज कार्यक्रम थाटात साजरा* *मराठा सेवा संघ कन्हान, माऊली महिला भजन मंडळ कन्हान व श्री हनुमान मंदिर देवस्थान कांद्री द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान-कांद्री ला जगतगुरू संत तुकाराम महाराज बिज कार्यक्रम थाटात साजरा*

*मराठा सेवा संघ कन्हान, माऊली महिला भजन मंडळ कन्हान व श्री हनुमान मंदिर देवस्थान कांद्री द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – मराठा सेवा संघ कन्हान, माऊली महिला भजन मंडळ कन्हान व श्री हनुमान मंदिर देवस्थान कांद्री येथे जगतगुरू संत तुकाराम महाराज बिज कार्यक्रम भजन, पुजन व आरती करून थाटात साजरा करण्यात आला .

मराठा सेवा संघ कन्हान व माऊली महिला भजन मंडळ कन्हान

संत तुकाराम महाराज मंदीर, तुकाराम नगर कन्हान येथे रविवार (दि.२०) मार्च ला मराठा सेवा संघ कन्हान व माऊली महिला भजन मंडळ कन्हान व्दारे जगतगुरू संत तुकाराम महाराज बीज निमित्य संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेस डॉ पं दे रा शि परिषद राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, सुर्यभानजी घोडकी, मोतीराम रहाटे, स्वप्निल मते आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी माऊली महिला भजन मंडळाने पुजन, भजन, आरती व प्रसाद वितरण करून संत तुकाराम महाराज बीज कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला. या प्रंगी माऊली महि ला भजन मंडळाच्या चंद्रभागा रेवतकर , प्रमिला मते , लता खर्चे , लक्ष्मी गडे , लता मेहर , डोणारकर काकु , कुंभलकर काकु , मनगटे काकु , सुनिता ईखार , आदीने विशेष सहकार्य करून जगतगुरू संत तुकाराम महाराज बीज कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला.

श्री हनुमान मंदिर देवस्थान कांद्री

रविवार (दि.२०) मार्च २०२२ ला कांद्री कोळसा खदान रोडवरील श्री हनुमान मंदिर देवस्थान परिसरात जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या बिज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी भजन, पुजन व आरती करून कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांनी संत तुकाराम महाराजांच्या कार्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित सर्व नागरिकांनी संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत बिज कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी वामन देशमुख, कवडु आकरे, मधुकर कामडे, रामा हिवरकर, वासुदेव आकरे, राजेश पोटभरे, सुरेश उमक, सुनिता हिवरकर, उषा वंजारी, इंदु टेभरे, इंदिरा मंसुहरे, उषा वाडीभस्मे सह ग्रामस्थ नागरिकांनी उपस्थित सहकार्य केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …