*पेट्रोल पंप वर उभ्या ट्रक च्या १० बँटरी अज्ञात चोरट्यांने केले चोरी*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस ५ किलो मीटर अंतरावर असलेल्या बोरडा रोड कांद्री रूद्रा पेट्रोल पंप समोर उभ्या असलेल्या ट्रक मधुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने १० बॅटऱ्या किंमत ७० हजार रूपये चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांक.१९ मार्च चे सकाळी ८ वाजता दरम्यान राजेश प्रभाकर हुड राहणार रायनगर कन्हान हा आपल्या घरी हजर असता सुपरवाइजर यांनी फोन करून सांगितले कि, कांद्री-बोरडा रोड वरील रुद्रा पेट्रोल पंप वर शुक्रवार दिनांक.१८ मार्च चे रात्री ८ ते शनिवार दिनांक.१९ मार्च २०२२ ला सकाळी ८ वाजता दरम्यान ४० ते ५० ट्रक उभे होते. त्यातील पाच ट्रक च्या १० बॅटऱ्या अँमरान कंपनीच्या किंमत प्रत्येकी ७,००० रुपये प्रमाणे एकुण ७०,००० रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी राजेश प्रभाकर हुड च्या तोंडी तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज