Breaking News

*२३ मार्च शहीदी दिवस निमित्त रक्तदान शिबिर संपन्न* *रक्तदान श्रेष्ठदान*

*२३ मार्च शहीदी दिवस निमित्त रक्तदान शिबिर संपन्न*


*रक्तदान श्रेष्ठदान*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर – बुधवार दिनांक 23 मार्च 2022 रोजी शहिदे आजम भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मरणार्थ “निखिल भुते लोकसेवा प्रतिष्ठान” द्वारा आयोजित रक्तदान शिबिरात अनेक युवकांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालय (GMC.) नागपूर या ठिकाणी रक्तदान करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सरस्वती पॅथॉलॉजी रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.विनोद जयस्वाल, समाजसेवक मुन्नाजी महाजन, राज्य रक्त संक्रमण परिषद चे सदस्य डॉ.राजेश नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे समाजसेवक अधिक्षक किशोर धर्माळे व विविध क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. उन्हाळ्यात नागपूर शहरात विविध हॉस्पिटल मधून मोठ्या प्रमाणात रक्ताची तुटवडा भरून काढण्यासाठी नागपूरातील निखिल भुते लोकसेवा प्रतिष्ठान द्वारे रक्तदान शिबिराचे विविध ठिकाणी रक्तदान कार्यक्रम घेण्यात येत आहे. यावेळी निखिल भुते, पंकज बांते, कमलजी गुप्ता, जितेंद्र श्रीसागर, विक्रांत चिलाटे, विनोद तितरमारे, दिगंबर भड, संजय राजधर, आशुतोष जांगडे, मंगेश भिवगडे व अनेक युवकांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ.देविका किनखेडे, डॉ. सुनील लाला, डॉ. नितीन तिरपुडे, डॉ. सुमित कुमार, जागृती सिगंणाजुडे, वैष्णवी टोग यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन पंकज बांते, प्रास्ताविक निखिल भुते, तसेच समाजसेवा अधिक्षक किशोर धर्माळे यांनी सर्वांचे आभार मानले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …