Breaking News

*जागतिक ग्राहक दिनानिमित्त रामटेक येथे विविध स्पर्धा आयोजित* *समर्थ कॉन्व्हेंट येथे पुरवठा विभागाच्या वतीने साजरा*

*जागतिक ग्राहक दिनानिमित्त रामटेक येथे विविध स्पर्धा आयोजित*


*समर्थ कॉन्व्हेंट येथे पुरवठा विभागाच्या वतीने साजरा*

रामटेक प्रतिनिधी :- पंकज चौधरी

रामटेक –  जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने समर्थ कॉन्व्हेंटमध्ये तहसील कार्यालय पुरवठा विभागाच्या वतीने रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के साहेब, निरीक्षण अधिकारी स्वप्नील पडोळे, नायब तहसीलदार सारीका धात्रक मॅडम, पुरवठा निरीक्षक अतिश जाधव, मुख्याध्यापिका घोष मॅडम व ग्राहक मंच महाराष्ट्र अध्यक्ष कांचनमाला माकडे मॅडम व अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखेचे अध्यक्ष राकेश मर्जीवे आणि दोन्ही संघटनेचे सदस्य, समर्थ कॉन्व्हेंटमधील सर्व शिक्षक व शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात पहिल्या तीन स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले, व मुलांना प्रशस्तीपत्र नोटबुक पुष्पगुच्छ आणि बिस्किटे देऊन स्वागत करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन पुरवठा निरीक्षक श्री.अतिश जाधव यांनी केले सदर कार्यक्रमाचे आयोजन तहसील कार्यालय रामटेक च्या पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले होते.तहसील कार्यालय प्रत्येक वर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी असे नवनवीन उपक्रम राबवुन त्यांच्या सुप्तगुणांना बाहेर आणण्याचा सदैव प्रयत्न करीत असतात.यासाठी तहसील कार्यालयाचे तहसीलदार श्री.बाळासाहेब म्हस्के हे नेहमी प्रयत्न करीत असतात.अशा उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच आनंद पहावयास मिळते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …