Breaking News

*कन्हान येथे शहिद भगत सिंह , राजगुरु आणि सुखदेव यांना दिली श्रद्धांजलि* *कन्हान शहर विकास मंच व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान येथे शहिद भगत सिंह , राजगुरु आणि सुखदेव यांना दिली श्रद्धांजलि*

*कन्हान शहर विकास मंच व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शहिद भगत सिंह , राजगुरु , आणि सुखदेव यांच्या शहिद दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन तारसा रोड शहिद चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा हस्ते शहिद स्मारकावर व शहिदांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करीत श्रद्धांजलि अर्पित करुन शहिद दिवस साजरा करण्यात आला .
बुधवार ला २३ मार्च २०२२ ला शहिद भगत सिंह राजगुरु आणि सुखदेव यांच्या शहिद दिवस निमित्य कन्हान शहर विकास मंच व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन तारसा रोड शहिद चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक भरत सावळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांच्या हस्ते शहिद स्मारकावर , शहिद भगत सिंह , राजगुरु , आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सर्व शहर विकास मंच व नेहरु युवा केंद्र च्या पदाधिकार्यांनी शहिद स्मारकावर व शहिदांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करीत श्रद्धांजलि अर्पित करुन शहिद दिवस साजरा करण्यात आला .


या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव सुरज वरखडे , सहसचिव प्रकाश कुर्वे , कोषाध्यक्ष महेश शेंडे , मार्गदर्शक भरत सावळे , प्रवीण कुमार हुड , केतन भिवगडे , शाहरुख खान , यश गजभिए , हिमांशु डाफ , वैभव थोरात , मंथन घारड , प्रफुल शेंडे सह आदि मंच व नेहरु युवा केंद्रा चे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …