Breaking News

दमयंतीताई देशमुख बीएड व डीएड अध्यापक विद्यालयात संविधान दिन साजरा

दमयंतीताई देशमुख बीएड व डीएड अध्यापक विद्यालयात संविधान दिन साजरा

रामटेक विशेष प्रतिनिधि: प्रेमानंद हटवार

भारतीय संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यावेळी बीएड व डीएड अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या जयश्रीताई देशमुख आणि रविकांत रागीट प्रशासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य रविकांत रागीट यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉली नागदेवे यांनी केले तर उद्देश पत्रिकेचे वाचन डी.एड ची विद्यार्थ्यांनी तेजस्विनी देवढगले हिने केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.प्रेमानंद हटवार यांनी भारतीय संविधानाची निर्मिती आणि आणि महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या प्राध्यापिका शालू वानखेडे यांनी मूलभूत अधिकार आणि कर्तव्य यावर प्रकाश टाकला. तर आभार प्रा. किरण शेंद्रे यांनी मानले. त्यावेळी उपस्थित महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व प्रा. नाईक मॅडम प्रा.दिलीप गिरडे प्रा.प्रशांत सरपाते प्रा. नेवारे प्रा.मिरासे प्रा.भावना ठाकरे प्रा.उके आणि इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …