*दिल्ली दरबार येथे दोन युवकाला गंभीर जख्मी करून आठ आरोपींनी दरोडा टाकुन बार चे १,३९,००० रूपये लुटले*
*परिसरात भीतीचे वातावरण निर्माण , फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल , आरोपी पसार*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस नागपुर जबलपुर चारपदरी महामार्गावरील एक किलो मीटर अंतरावर असलेल्या नाका नंबर ७ येथील दिल्ली दरबार बार अँड रेस्टोरेंट येथे आठ आरोपींनी बार मध्ये प्रवेश करून दोन युवकावर तलवार व चाकु ने प्राणघात हल्ला करून जख्मी केले व चाकुचा धाक दाखवुन काॅंउन्टर मधुन १,३९,००० रूपये चा मुद्देमाल दरोडा टाकुन पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार दिनांक .३० मार्च २०२२ ला सायंकाळी ६:५० ते ७:१५ वाजता च्या दरम्यान फिर्यादी आशिष आतरामजी वडस्कर वय ४२ वर्ष राहणार रामनगर कन्हान हे आपल्या दिल्ली दरबार बार अँण्ड रेस्टोरेंट मध्ये कामावर हजर असतांना आरोपी १) सोपान ठाकरे २) लकी भेलावे ३) अक्षित मेश्राम ४) अजय भेलावे व इतर तीन ते चार अनोळखी इसम सर्व राहणार कांद्री कन्हान यांनी संगमत करून शुभम सलामे व रोहित यादव यांना जिवे मारण्याचा उद्देशाने बार मध्ये प्रवेश करून शुभम सलामे व रोहित यादव यांचेवर तलवार व चाकु ने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न करित गंभीर जख्मी केले. व बार चे काॅउन्टर मधुन रोख १,१७,००० रूपये, एक विवो कंपनीचा मोबाइल किंमत १२,००० रूपये व एक रियल मी कंपनीचा मोबाइल किंमत १०,००० रूपये असा एकुण १,३९,००० रूपया चा मुद्देमालावर दरोडा टाकुन जबरदस्ती ने तलवार व चाकु चा धाक दाखवुन काॅंउन्टर मधुन घेवुन गेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी आशिष वडस्कर यांच्या तोंडी तक्रारी वरून आठ आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक १६५ /२०२२ कलम ३९७ भादंवि, सह कलम ४/२५ भहका अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे हे करीत असुन पसार आरोपीचा शोध घेत आहे.