Breaking News

*प्राथमिक शाळा बोरडा येथे वर्ग 8 च्या विद्यार्थ्यांना निरोप*

*प्राथमिक शाळा बोरडा येथे वर्ग 8 च्या विद्यार्थ्यांना निरोप*


रामटेक – तालुक्यातील जि.प.उच्च प्राथमिक शाळा बोरडा येथे आज दि.30 एप्रिल 2022 रोज बुधवार ला वर्ग 8 च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिक्षण समितीच्या अध्यक्षा सौ.सुनीता ब्राम्हणकर,उपाध्यक्ष श्री.उमाशंकर सूर्यवंशी,बबन हजारे,राजेंद्र नागपुरे,निलकंठ दडमल,रविंद्र नारनवरे,कमलाकर मेश्राम,पंकज चौधरी सौ.पुष्पा धारणे,सुलोचना लांजेवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी तनवी नारनवरे यांनी केले. वर्ग 8 च्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून अत्यंत अश्रूपूर्ण शब्दात शाळेचे निरोप घेतले.व शिक्षकांचा आभारही मानले.लहान मुलांच्या मनोरंजनाच्या दृष्टीने काही मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रमाचेदेखील सादरीकरण केले. शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना नवीन वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी शिक्षकांच्या डोळ्यात देखील अश्रू दिसून आले.शेवटी आभार प्रदर्शन करून गोड स्वादिष्ट भोजनाने या कार्यक्रमाची शेवट करण्यात आली..

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …