Breaking News

*आज श्री महाकाली मंदीरात चैत्र नवरात्री घट स्थापना*

*आज श्री महाकाली मंदीरात चैत्र नवरात्री घट स्थापना*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – नागपुर जिल्हयातील पावन कन्हान नदी च्या काठावरील प्रसिध्द ‘क’ तिर्थ क्षेत्र असलेले श्री महाकाली मंदिर सत्रापुर रोड कन्हान येथे श्री महाकाली सेवा समिती कन्हान-सत्रापुर व्दारे चैत्र नवरात्री निमित्य दरवर्षी प्रमाणे चैत्र शु पंचमी आज बुधवार दिनांक.६ एप्रिल २०२२ ला सकाळी ९ वाजता घट स्थापना करून चैत्र नवरात्र उत्सवाची सुरूवात होणार आहे. नव दिवस पुजा, अर्चना, सकाळ, सायंकाळ आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून चैत्र नवरात्र उत्सव थाटात साजरा करण्यात येणार आहे. करिता जिल्हयातील सर्व भाविक भक्त मंडळींनी निर्धारित वेळेस उपस्थिती राहुन श्री महाकाली मातेच्या दर्शनाचा तसेच धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री महाकाली सेवा समिती कन्हान-सत्रापुर चे सचिव श्री उत्तमराव दुरगकर महाराज हयानी केले आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …