Breaking News

*शिक्षिका लता वंजारी यांना निरोप* *निवृत्तीनंतरही सत्र संपेपर्यंत निशुल्क सेवा देण्याचा निर्धार*

*शिक्षिका लता वंजारी यांना निरोप*

*निवृत्तीनंतरही सत्र संपेपर्यंत निशुल्क सेवा देण्याचा निर्धार*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील पंचायत समिति अंतर्गत उच्च प्राथमिक शाळा, निलज येथील शिक्षिका सौ.लता मंगल वंजारी यांचा सेवानिवृत्ती निमित्य सेवापूर्ती सोहळा नुकताच निलज येथे पार पडला. कार्यक्रमाला रामटेक लोकसभेचे माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव, जिल्हा परिषद गोंडेगाव-साटक सर्कलचे सदस्य व्यंकटराव कारेमोरे , ग्राम पंचायत सरपंचा आशाताई पाहुणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजु पाहुणे, सौरभ पराते, अरविंद नंदेश्वर, शांताराम जळते, मंगल वंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवापूर्ती सोहळा पार पडला. यावेळी सौ.लता वंजारी यांचा पतीसह सत्कार करण्यात आला . सेवानिवृत्तीनंतरही चालु सत्र संपेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी निशुल्क सेवा देण्याचा निर्णय व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनराज बोडे यांनी, संचालन सुधाकर मोहरले तर आभार सौ. लता जळते यांनी व्यक्त केले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …