*ग्रामपंचायत कांद्री खदान च्या उपसरपंचासह सात सदस्य अपात्र घोषीत*
रामटेक – गट ग्राम पंचायत कांद्री (खदान ) च्या उपसरपंचासह सात ग्रामपंचायत सदस्यांना मा . अप्पर जिल्हाधिकारी नागपुर यानी विहीत मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांना अपात्र घोषीत करून त्यांचे सदस्यत्व रद्द केलेले आहे .
प्राप्त माहिती नुसार तालुका रामटेक अंतर्गत गट ग्रामपंचायत कांद्री ( खदान ) येथे दिनांक 26/09/2018 रोजी झालेल्या सार्वत्रीक निवडणूकीमध्ये राखीव जागेवर विजय प्राप्त करून निवडून आलेले सदस्य होते .त्यामध्ये (1 ) मंजीत रामचंद्र बहेलीया,उपसरपंच
(2) बरखा प्रमोद कठौते सदस्या
( 3 ) ज्योती अनिल कठौते सदस्या
( 4 ) कमल बापूराव रौतेल सदस्य
(5) विक्की नरेश देशमुख सदस्य
(6) वच्छला ताई जंगलु येलुरे सदस्या
(7) मोरेश्वर सिताराम सलामे सदस्य
( 8 ) लक्ष्मी लक्ष्मण इडपाची सदस्या यांचा समावेश होता
कांद्री ग्रामपंचायत मध्ये सरपंच व 15 सदस्य असे एकून 16 सदस्यीय कार्यकारीनी आहे अजय आनंद कुमार कठौते मु कांद्री (माईन )यांनी घेतलेल्या आक्षेपावर अप्पर जिलाधिकारी नागपूर यांच्या आदेशान्वये ग्रामपंचायत अधिनियम 1956 चे कलम 10 (1 -अ] अन्वये विहित मुदतित जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अपात्र घोषीत करून त्यांचे ग्रामपंचायत चे सदस्यत्व रद्द केलेले आहे .एकाच वेळेस आठ सदस्य अपात्र घोषीत झाल्यामुळे होणाऱ्या मध्यावती चुनावाकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज