*कन्हान येथील निलज (खंडाळा) गावात अंदाजे २० ते २५ लाखांचा दरोडा या चोरी ?* *परिसरात गुन्हेगारी वाढली , शांती सुव्यवस्था कायम करण्याची मागणी* *अवैध धंद्याना सुगीचे दिवस , पोलीसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण परिसरातील नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण*

*कन्हान येथील निलज (खंडाळा) गावात अंदाजे २० ते २५ लाखांचा दरोडा या चोरी ?*

*परिसरात गुन्हेगारी वाढली , शांती सुव्यवस्था कायम करण्याची मागणी*

*अवैध धंद्याना सुगीचे दिवस , पोलीसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण परिसरातील नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन पासुन पुर्वेस ६ किलो मीटर अंतरावर असलेल्या निलज (खंडाळा) गाव येथील जिल्हा परिषद सदस्य व विरोधी पक्ष नेता व्यंकटेश कारेमोरे यांचे भाऊ कैलास कारेमोरे यांच्या घरी रात्री कोणीतरी अज्ञात चोरानी एकुण अंदाजे २० ते २५ लाखांचा मुद्देमाल चोरुन पसार झाल्याने
परिसरातील नागरिकांन मध्ये चांगलेच भितीचे वातावरण निर्माण झाले असुन ही चोरी आहे कि दारोडा आहे अशी चर्चा नागरिकांन मध्ये सुरु असल्याने कन्हान पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन पुढील तपास सुरु केला आहे .


सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार बुधवार दिनांक ६ ला दुपारी च्या दरम्यान जिल्हा परिषद सदस्य व विरोधी पक्ष नेता व्यंकटेश कारेमोरे यांचे भाऊ कैलास कारेमोरे हे आपल्या परिवारा सोबत गुजरात ला काही कामानिमित्य निघुन गेले . या दरम्यान आज गुरूवार दिनांक ७ ला तडक्या रात्री २ ते ४ वाजता च्या दरम्यान कैलास कारेमोरे यांचे नातेवाईक व परिवार घरातील समोर च्या रुम मध्ये झोपले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरातील मागचे दार तोडुन अंदर प्रवेश करुन घरातील झडती घेतली असता त्यांनी घरातील नगदी १ लाख रू.१० तोळे सोने, १ पाव चांदी व इतर जवळपास अदाजे २० ते २५ लाखाचा मुद्देमाल चोरून पसार झाले .आज सकाळ च्या सुमारास कुंटुबियाना लक्षात आल्याने त्यांनी सदर घटनेची माहिती जिल्हा परिषद सदस्य व विरोधी पक्ष नेता व्यंकटेश कारेमोरे यांना दिली असता त्यांनी कन्हान पोलीस स्टेशन ला दिली तरी कन्हान पोलीस उशीरा सकाळी ११.३० वाजता दरम्यान कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे हे आपल्या ताफासह घटनास्थळी पोहचले व पंचनामा करुन पुढील तपास सुरु केला आहे .

*परिसरात अवैध धंद्याना सुगीचे दिवस*

कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरात अवैद्य धंद्याना सुगीचे दिवस आल्याने कोळसा, रेती, लोंखड, डिझेल, घरफोडी व इतर अनेक चोऱ्या, मारामारी, लुटमार वाढुन सर्व सामान्य नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती नाजुक होत आहे. कन्हान थानेदार विलास काळे व पोलीसाच्या कार्यप्रणाली वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असुन सुध्दा वरिष्ठ पोलीस अधिकारी मुंग गिळुन गप आहेत का ? अशी चर्चा कन्हान परिसरात चांगलीच रंगात येत असल्याने शासन, प्रशासनाने वेळीच संबधित पोलीस अधिकाऱ्यावर योग्य कार्यवाही करून कन्हान परिसरात शांती सुव्यवस्था कायम करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चेतुन सामोर येत आहे .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …