*कन्हान येथे भाजपा द्वारे ४२ वा स्थापना दिवस थाटात साजरा* *जेष्ठ नागरिकांचा सत्कार करुन केंद्र शासना च्या योजनेची व कार्याची दिली माहिती*

*कन्हान येथे भाजपा द्वारे ४२ वा स्थापना दिवस थाटात साजरा*

*जेष्ठ नागरिकांचा सत्कार करुन केंद्र शासना च्या योजनेची व कार्याची दिली माहिती*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथे भाजपा पारशिवनी तालुका , भाजपा कन्हान शहर व भाजपा कांद्री शहर यांच्या संयुक्त विद्यमाने भाजपा चा ४२ वा स्थापना दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन तारसा चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते जेष्ठ नागरिकांचा सत्कार करुन व केंद्र शासनाच्या विविध योजने ची व कार्याची माहिती देऊन स्थापना दिवस थाटात साजरा करण्यात आला .


बुधवार दिनांक ६ एप्रिल २०२२ ला भाजपा चा ४२ वा स्थापना दिवस निमित्य भाजपा पारशिवनी तालुका , भाजपा कन्हान शहर , व भाजपा कांद्री शहर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन तारसा चौक येथील रामभाऊ दिवटे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित रामटेक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डी मल्लीकार्जुन रेड्डी , ग्रामविकास आघाडी अध्यक्ष राजेश ठाकरे , भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे , तालुका अध्यक्ष अतुल हजारे , कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , कांद्री शहर अध्यक्ष गुरुदेव चकोले सह आदिं च्या हस्ते पुर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेई , पंडित दिनदयाल उपाध्याय , डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत केंद्र शासनाच्या विविध योजने ची व भाजपा च्या विविध कार्याची माहिती दिली . कार्यक्रमात उपस्थित भाजपा जेष्ठ नागरिकांना दुपट्टा , शाॅल , श्रीफल , कैलेंडर , व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करुन भाजपा स्थापना दिवस थाटात साजरा करण्यात आला .


या प्रसंगी मुलचंद शिंदेकर , राजेंद्र पाटील , नत्थुजी चरडे , सुनिल लाडेकर , राजेंद्र शेंदरे , रिंकेश चवरे , संजय रंगारी , लीलाधर बर्वे , कामेश्वर शर्मा , मनोज कुरडकर , नरेश पोटभरे , अजय लोंढे , संजय चोपकर , माधव वैद्य , अदरीराम कनोजिया , भरत सावळे , मयुर माटे , लोकेश आंबाळकर , सौरभ पोटभरे , ऋषभ बावनकर , प्रमोद वंजारी , विक्की सोलंकी , स्वाती पाठक , सुषमा चोपकर , संगीता खोब्रागडे , अनिता पाटील , सुषमा मस्के , सुनंदा दिवटे , तुलेषा नानवटकर , शालीनी बर्बे , संगीता देशभ्रतार , वर्षा लोंढे , अनिता साकोरे , वंदना कुरडकर , प्रतीक्षा चवरे , सह आदि भाजपा पदाधिकारी , कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …