*आज नागपुर ते रामटेक पायदळ वारी चे कन्हान-कांद्री ला आगमण*
*परिसरात होणार पायदळ वारीचे भव्य स्वागत*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – सर्वश्री वारकरी सांप्रदाय सेवा समिती व्दारे श्री राम नवमी निमित्य श्री संत ञानेश्वर मंदीर जुनी मंगळवारी नागपुर ते श्री क्षेत्र रामटेक पायदळ वारी दिंडी सोहळा चे कन्हान-कांद्री येथे आगमण व मुक्काम होणार आहे.
श्री राम नवमी निमित्य सर्वश्री वारकरी सांप्रदाय सेवा समिती व्दारे गुरूवार दिनांक .७ एप्रिल ते सोमवार दिनांक.११ एप्रिल २०२२ पर्यंत श्री संत ञानेश्वर मंदीर जुनी मंगळवारी नागपुर ते श्री क्षेत्र रामटेक पायदळ वारी दिंडी सोहळाचे आयोजन करून गुरूवार दिनांक . ७ एप्रिल ला सकाळी ७ वाजता श्री संत ञानेश्वर मंदीर जुनी मंगळवारी नागपुर अभिषेक, पुजन करून पायदळ वारी दिंडी सोहळयाची सुरूवात होऊन सायंकाळी ७ वाजता भवानी माता मंदीर पारडी नागपुर येथे भजन, किर्तन, भोजन व मुक्काम राहणार आहे . आज शुक्रवार दिनांक .८ ला सकाळी ६ वाजता पारडी येथुन प्रस्थान करून भरतवाडा येथे फरा़ळ, सकाळी १० वाजता कामठी रोज मढी दुर्गा मंदीर घोरपड येथे जेवन सायंकाळी ५ वाजता साई मंदीर कामठी-कन्हान येथे चहापाणी घेऊन सायंकाळी ६ वाजता कन्हान नगरीत आगमन होताच स्वागत करून श्री संताजी स्मृती सभागृह कन्हान-कांद्री येथे भजन, किर्तन, भोजन व रात्री मुक्काम करून शनिवार दिनांक ९ एप्रिल ला सकाळी ६ वाजता कांद्री, बोरडा रोड निमखेडा मार्ग रामटेक करिता प्रस्थान करण्यात येणार आहे .