Breaking News

*२४ एप्रिल लाल रामटेक येथे २० वे महाराष्ट्र राज्य उच्च श्रेणी मुख्याध्यापक व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक महासभेचे अधिवेशन*

*२४ एप्रिल लाल रामटेक येथे २० वे महाराष्ट्र राज्य उच्च श्रेणी मुख्याध्यापक व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक महासभेचे अधिवेशन*


रामटेक प्रतिनिधी :- पंकज चौधरी
रामटेक – महाराष्ट्र राज्य उच्च श्रेणी मुख्याध्यापक व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक महासभा अंतर्गत नागपूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक महासभा रामटेक तालुका शाखेच्या वतीने २० वे नागपूर जिल्हा अधिवेशन समारंभ २४ एप्रिल ला सकाळी ११ वाजता स्व. घनश्यामराव किममतकर सांस्कृतिक सभागृह रामटेक ला आयोजीत करण्यात आले. आहे.अधिवेशनाचे उद्घाटक युवक कल्याण तथा पशू संवर्धन मंत्री ना.सुनिलबाबू केदार यांचे हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मीताई बर्वे तर विशेष अतिथी म्हणून रामटेक चे आमदार अँड.आशिष जयस्वाल , नागपूर जिल्हा पदविधर आमदार अँड.अभिजीत वंजारी,जि.प.शिक्षण सभापती भारती पाटील , रामटेक प.स.सभापती कलाताई ठाकरे उपस्थीत राहतील. स्वागताध्यक्ष नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष अशोकराव दगडे तर प्रमुख अतिथी नागपूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुभेजकर,उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल किटे, प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहीणी कुभार , जि.प.सदस्य दूधराम सवालाखे, रामटेक प.स.गट विकास अधिकारी संदिप गोडशेलवार,गट शिक्षणाधिकारी संगिता तभाणे,अशोक दूर, नारायण समर्थ,१३ तालूक्यातील अध्यक्ष ,सचिव, जिल्हा प्रतिनिधी शिक्षक,शिक्षिका उपस्थित राहतील. अधिवेशनात जेष्ठ शिक्षकाचाही सत्कार करण्यात येणार असल्याचे १२ एप्रिल च्या आमसभेत उच्च श्रेणी मुख्याध्यापक व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक महासभा नागपूर च्या रामटेक शाखेचे अध्यक्ष एम.एन.सावरकर यांनी सांगितले.आमसभेत मागिल सभेचे इतिवृत्त सरचिटणीस डी.पी.वानखेडे यांनी वाचून दाखविले.अधिवेशनाचा जमाखर्च व अधिवेशन सफल करण्यासाठी सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या सभेत अध्यक्ष सावरकर, कार्याध्यक्ष रमेश बिरणवार, उपाध्यक्ष बाबूराव काठोके, कोषाध्यक्ष उमाकांत माकडे,सह संघटक चित्तरंजन गाढवे, जिल्हा प्रतिनिधी प्रविण बेले,श्रीराम नागोसे, संघटक गुलाब ठाकरे,रेखा मटकर, वसंत बूधे, यांनी सहभाग घेतलेला होता. अधिवेशनाला सेवानिवृत्त शिक्षकांनी तथा प्राथमिक शिक्षक जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अधिवेशन रामटेक तालूका प्रसिद्धी प्रमुख एन.आर.रामेलवार यांनी आवाहन केले आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …