*कन्हान येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती थाटात साजरी*
*कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली
गुरुवार दिनांक १४ एप्रिल २०२२ ला कन्हान शहर विकास मंच द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित जेष्ठ नागरिक ताराचंद निंबाळकर , भरत सावळे , प्रभाकर रुंघे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच अध्यक्ष ॠषभ बावनकर , भरत सावळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती थाटात साजरी करण्यात आली .

या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ॠषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , सचिव सुरज वरखडे , सहसचिव प्रकाश कुर्वे , कोषाध्यक्ष महेश शेंडे , मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , ताराचंद निंबाळकर , योगेश थोरात , यश गजभिए , अनुराग महल्ले , रोहित मानवटकर , शाहरुख खान , कृणाल राजपुत , प्रवीण हुड , मंथन घारड , हर्ष पाटील , महेंद्र चव्हान , रविंद्र दुपारे , अशोक पाटील , सह आदि मंच पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज