*कन्हान पुल वरुन दोन मोटार पंप चोरी*
*फिर्यांदी यांच्या तक्रारी वरुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कन्हान पुल वर लावण्यात आलेली दोन एचपी व हमदबल कंपनी ची मोटार पंप अज्ञात चोराने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार फिर्यादी दुर्गेश अनिल वाघ वय २२ वर्ष रा कडोली यांनी कन्हान पुल येथे लावण्यात आलेली दोन एचपी किंमत १,३५,०० रु ची तसेच हमदबल कंपनी ची किंमत १३०३६ रुपए असे २ मोटात पंप किंमत २६,५३६ रु चा माल अज्ञात चोराने चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी दुर्गेश अनिल वाघ यांच्या तक्रारी वरुन आरोपी विरुद्ध अप . क्रमांक १७७/२०२२ कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार अरुण कुमार सहारे हे करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज