*टेकाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान :- कन्हान परिसरातील टेकाडी (को.ख.)ग्राम पंचायत कार्यालाय येथे विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती मोठ्या उत्साहात आनंदात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमा ला ग्राम पंचायत टेकाडी सरपंच सौ.सुनिताताई पृथ्वीराज मेश्राम तसेच व ग्रामपंचायत चे ग्राम सेवक आतिश देशभ्रतार ,ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामपंचायत सदस्य अरूण सुर्यवंशी , ग्रामपंचायत सदस्य सुरेखा कांबळे , ग्राम पंचायत सदस्या सिंधुताई सातपैसे , ग्राम पंचायत स्दस्या मायाताई मनगटे , यांनी दिप प्रज्वलित करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली तसेच इतर सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी विला सावरकर , मनोज मोहोड , सुनिता वानखेडे , यांनी सुद्धा महामानवाच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली यानंतर गावातील प्रातिष्ठित नागरिक यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्य विषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यकमात ग्रामपंचायत ग्राम सेवक आतिश देशभ्रतार यांनी उपस्थितांचे आभार म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Maharashtra News Media सच की आवाज