Breaking News

*राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी कन्हान शहर द्वारे अल्पोहार वितिरित* *डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन*

*राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी कन्हान शहर द्वारे अल्पोहार वितिरित*

*डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

कन्हान – राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी कन्हान शहर द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी रामटेक विधानसभा कार्याध्यक्ष अशोक पाटील यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले . त्यानंतर परिसरात नागरिकांना अल्पोहार (आलुभात) वितरण करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .


या प्रसंगी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी रामटेक विधानसभा कार्याध्यक्ष अशोक पाटील , तालुका व्यापारी आघाड़ी अध्यक्ष संजय दिगपती , जिल्हा ग्रामीण मिडिया प्रमुख रोहित मानवटकर , मोहम्मद शपीक शेख , माजी सरपंच कैलाश भिवगडे , रतिराम सहारे , देविदास जामदार , ज्ञानेश्वर विघे , शंकर थुटे , केतन भिवगडे , अरविंद कठाळे , राहुल भाऊ , बालू बघेल , नरेश सोनेरी , श्यामलाल रोकडे , बिपिन गणवीर , सह आदि नागरिक उपस्थित होते .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …