*महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक :महात्मा फुले*
कोराडी प्रतिनिधि-दिलीप येवले
तायवाडे महाविद्यालय महादुला-कोराडी येथे “महात्मा ज्योतीराव फुले ” यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम महाविद्यालयातील जयंती -पुण्यतीथी समीतीच्या वतीने आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील संगनक विभागप्रमुख डॉ. गिरीष काटकर हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन डॉ.वकील शेख यांनी केले .महाविद्यालयातील संगनक विभागप्रमूख डॉ.गिरीष काटकर (IQAC Coordinator) यांच्याहस्ते महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतीमेला हारार्पण करण्यात आले.डॉ.वकील शेख यांनी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जिवन कार्यावर थोडक्यात प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे आभार डॉ.रविंद्र बाहेकर यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील जयंती-पुण्यतीथी समीतीच्या समन्वयक डॉ.निता धावडे तसेच सदस्य डॉ.राजेंद्र वाटाणे,डॉ मारोती वाघ,डॉ.आनंद भाईक आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.