*मोठी बातमी*
*मौदा येथे कन्हान नदी च्या पात्रात एका इसमाचा डुबुन मृत्यु*
*फिर्यादी मुलगा यांच्या तक्रारी वरुन मौदा पोलीस स्टेशन ला मर्ग दाखल*
मौदा – मौदा पोलीस स्टेशन अंतर्गत कन्हान नदी च्या पात्रात एका इसमाचा डुबुन मृत्यु झाल्याने मौदा पोलीसांना फिर्यादी मुलगा यांच्या तक्रारी वरुन पोस्टे ला मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
पोलीस सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार शनिवार दिनांक २३ एप्रिल २०२२ ला सायंकाळी ६:३० वाजता च्या दरम्यान मृतक जानबा सहादेव डोंगरे वय ५४ वर्ष राहणार शिवाजी नगर मौदा हे कन्हान नदीत अंघोळ करण्या करिता गेले होते . फिर्यादी मुलगा रोहित डोंगरे यांच्या वडिलांना फिट ची बिमारी असल्याने अंघोळ करतांना फिट आल्याने त्यांचा कन्हान नदी पात्रात पाण्यात डुबुन मृत्यू झाला आहे . अश्या फिर्यादी मुलगा नामे रोहित जनबा डोंगरे वय २४ राहणार शिवाजी नगर मौदा यांच्या तोंडी रिपोर्ट वरून मौदा पोलीसांनी पो स्टे ला मर्ग क्रं. २३/२२ कलम १७४ जा फौ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास मौदा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक हेमंत खराबे यांच्या मार्गदर्शनात मौदा पोलीस करीत आहे .