*खंडाळा येथे लाभार्थ्यांना कोंबडया व पक्षीघर वाटप*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – एकात्मिक कुक्कुट पालन विकास कार्यक्रमा अंतर्गत ग्रा प खंडाळा (घटाटे) येथे पशु वैद्यकीय दवाखाना कन्हान यांचे विद्यमाने परिसरातील लाभार्थ्यांना २४ मादी , ३ नर कावेरी प्रजाती च्या कोंबडया व पक्षीघर वाटप करण्यात आले.
शनिवार (दि.२३) एप्रिल ला एकात्मिक कुक्कुट पालन विकास कार्यक्रम अंतर्गत ग्रा प खंडाळा (घटाटे ) येथे पशु वैद्यकीय दवाखाना कन्हान यांचे विद्यमाने जिल्हा परिषद नागपुर अध्यक्षा मा.सौ रश्मीताई बर्वे यांच्या हस्ते परिसरातील लाभार्थ्यांना २३ मादी, ३ नर कावेरी प्रजाती च्या कोंबड्या व त्यासाठी पक्षीघर चे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते व जिल्हा परिषद गोंडेगाव-साटक सर्कल चे सदस्य मा.श्री व्यंकटेश कारेमोरे, पंचायत समिति पारशिवनी सभापती मा.सौ मीनाताई कावळे , पशु वैद्यकीय अधिकारी सौ वाळके मॅडम, खंडाळा सरपंचा सौ विमल बोरकुटे, उपसरपंच श्री चेतन कुंभलकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी परिसरातील खंडाळा, गहुहिवरा, निलज, खेडी, बोरडा येथील २१ लाभार्थ्यांना वाटप करून लाभ देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता पशु वैद्यकीय अधिकारी सौ वाळके मॅडम व त्यांचे सह कर्मचारी, ग्रा प सचिव श्री व्ही के गहाने आणि कर्मचारी आदी ने सहकार्य केले.
Maharashtra News Media सच की आवाज