Breaking News

*तालुका वैद्धकीय कार्यालय नरखेड येथून सावरगावला स्थलांतरीत”* *कार्यालयाच्या जीर्ण इमारतीचे कारण समोर*

*तालुका वैद्धकीय कार्यालय नरखेड येथून सावरगावला स्थलांतरीत”*

*कार्यालयाच्या जीर्ण इमारतीचे कारण समोर*

प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे

नरखेड – तालुक्यात एकंदरीत ,जलालखेडा,मेंढला,सावरगाव ,मोवाळ,भीष्नूर अशी एकुण 5 प्राथमिक आरोग्य केंद्र असुन या अंतर्गत येणार्या उपकेंद्रची एकुण संख्या ही 26आहेत ,त्यात सावरगाव मध्ये 6,जलालखेडा 5,मेंढला 7,मोवाळ 4,तर भीष्णुर मध्ये 4अशी एकुण 26 आरोग्य उपकेंद्र आहेत .

अश्यातच आता मागिल वर्षापर्यंत तालुका वैद्कीय अधिकार्यांचे कार्यालय हे नरखेड येथे कायम स्वरुपी होते ,प्राथमिक आरोग्य केंद्र तथा उपकेंद्र येथील कर्मचर्याना पडणारी काम ही नरखेड येथील तालुका वैद्कीय कार्यालयातून होत होती ,उपकेंद्रातील तसेच प्रा,आरोग्य केंद्रातील कर्मचार्याना वारंवार तालुका वैधकीय कार्यालयाला कामा निमित्यने येथे येणे जाने करावे लागते ,जिल्हा वैधकीय कार्यालय तसेच जिल्हातिल तालुक्या अंतर्गत येणार्या प्राथमिक आरोग्य केंद्रमधील महत्वाचा दुवा हे तालुका वैधकीय कार्यालय असते,जिल्हा स्तरावरुन आरोग्यासंदर्भात वापरण्यात येणार्या विविध योजना ,उपाय हे तालुका वैधकीय कार्यालयाला सिफृद केले जाते ,यावर संपुर्ण वर्चस्व हे तालुका वैधकीय अधिकार्यांचे असते , या अश्या अनेक आरोग्या संदर्भच्या नियोजित उपाय योजना विषयी तलुक्यतील संपुर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैधकीय अधिकारी,आरोग्य पर्वेक्षक ,महिला परिवेक्षीका ,आरोग्य सेवक ,आरोग्य सेविका यांच्या मीटिंग किमान अंदाजित महिन्यातून एक दा अथवा 15दिवसातून एक दा असतेच येवढेच नाही तर वेतन संदर्भ ,इतर काही मस्टर अशी देखील अन्य कामे देखील तालुका वैधकिय कार्यालयाला असतात .

पण सध्या तालुक्याच्या ठिकानी असलेले तालुका वैधकीय कार्यालय हे सावरगाव येथे हलविण्यात आले आहे ,त्यामूळे तालुकातील जनसामान्याला पडणारी कामे ही नरखेड सोडून सावरगावची धाव घेउन करावी लागत आहे ,नरखेड हे तालुक्यात मध्यती असुन आजू बाजू कडुन ये जा करन्यासाठी सोईस्कर होते ,पण सध्या स्थितीत असलेले तालुका वैधकीय कार्यालय सावरगाव येथे असुन ये-जा करण्यासाठी बरीच दमछाक होत असते तसेच गाडी भाड्याला अधिकार्यासोबत जनसामान्यला परवडे नासे आहेत.

:-

पंचायत समिती नरखेड येथे आरोग्य विभाग कार्यालय आहे ,तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हे ग्रामीन रुग्णालय नरखेड परिसरात मोडक्या जीर्ण इमारतीत येत होते .या संदर्भी उपअभियंता बांधकाम व वैधकीय अधिक्षक यांनी धोक्याची समज दिली होती व तसे या विषयीचे पत्र देखील कार्यालयाला दिले होते .तसेच येथीलकार्यरत कर्मचारी यांनी देखील त्यांच्या जीवाला धोका असल्या बाबत निवेदन दिले ,त्याबद्दचा पत्रव्यवहार करण्यात आला ,नरखेड पंचायत समिती येथे नव्याने बांधकामाचा प्रस्थाव प्रस्थापीत आहे,तसेच प,स,येथे आरोग्य विभाग कार्यालय आहे येथे बरेचश्या तालुका स्तरीय सभा घेतल्या जातात ,येथे लवकरच जागा उपलब्द होइल ,जो पर्यंत जागा नाही तो पर्यंत काही काळासाठी तालुका वैधकीय कार्यालय सावरगाव येथे स्थलांतरित करण्यात आले आहे .

डॉ.विद्यानंद गायकवाड,तालुका वैधकिय अधिकारी

:-
तालुका वैधकीय कार्यालय जीर्ण अवस्थेत असल्याचे निदर्शनात आल्याने मागिल 10महिन्यापुर्वी हे कार्यालय सावरगाव येथे बदलविन्यत आले पण लगेचच जलद गतीने पंचायत समिती परिसरात जागेची व्यवस्था करुन नविन वैधकीय इमारतीसह कार्यालय बनविण्यात येइल.

निलिमा सतिश रेवतकर ,सभापती प.स.नरखेड

:-
तालुका वैधकीय अधिकार्यच्या कार्यालयाची इमारत जीर्ण झाल्याचे समजताच ,नविन इमारतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे ,तसेच नरखेड तलुक्यतिल जनसामान्याला आरोग्य संदर्भी अडचणी जाऊ नये म्हणून पंचायत समिती नरखेड कार्यालयात यांना काही काळासाठी कार्यालय देण्यात यावे ,या विषयी ठराव घेतलेला आहे .

प्रविण(बालू)जोध ,जिल्हा परिषद सदस्य नागपुर

:-
तालुास्तरीय अरोग्याच्या दृष्टीने तालुका आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय हे तालुक्याच्या ठिकाणी असणे आवश्यक असते, परंतु मागील १वर्षापासून हे कार्यालय नरखेड येथे जागा उपलब्ध नसल्याचे कारणाने सावरगाव येथे असुन कोरोनासारख्या महामरित कर्मचारी तसेच लोकांच्या आरोग्या प्रती हे सरकार किती गंभीर आहे हे दिसुन येते
दिलेश ठाकरे
तालुका महामंत्री भाजप

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …